मुंबई दि.३ जुलै
शिवसेना आमचीच असा दावा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि बंडखोर आमदार करत असताना आता एक नवीन वाद समोर येेेण्यची शक्यता असून शिवसेनेनचं विधान भवनातील विधीमंडळ कार्यालयच आता सील करण्यात आलं आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदारांनी आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा आमचा असून दोन तृतीयांश आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर गटाने केला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेने बंडखोरांवर कारवाईसाठी पावले उचलली आहेत. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम विधीमंडळातील पक्षाच्या दालनावरही दिसून येत आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय यांनी कळविल्यामुळे दालन बंद ठेवण्यात आल्याची सूचना लावण्यात आली आहे. या पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्यात आले आहे.