Homeराजकारणशिवसेनेचा जन्मच संघर्षासाठी आम्ही मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी नगर...

शिवसेनेचा जन्मच संघर्षासाठी आम्ही मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी नगर तालुक्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांच निर्णय

advertisement

अहमदनगर दि.२५ जून
महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याबाबत शिवसैनिकांमध्ये संभ्रम अवस्था आहे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही कुंपणावर असून त्यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही तर काही पदाधिकारी आणि शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगत आहे नगर तालुक्यातील शिवसेना नेत्यांनी आज पुलगाव येथे रस्त्यावर उतरून आपण शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे सामान्य शिवसैनिकांना मोठी ठरणारी ही शिवसेना संघटना असून शिवसेनेबरोबर गद्दारी करणाऱ्या लोकांना सद्बुद्धी मिळो आणि पुन्हा ते शिवसेनेबरोबर परत यावेत अशी आशा नगर तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख जिल्हा परिषद सदस्य संदेश काढले यांनी व्यक्त केले आहे.


नगर शहरातील एमायडिसी भागात असलेल्या नवनागापूर येथे सर्व शिवसैनिकांनी एकत्र येत मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपण उभा राहू आणि आज पर्यंत शिवसेनेमध्ये बंड झालेल्या आमदारांचे काय हाल झाले आहेत हे सर्वांना माहीत असल्याने आणि शिवसेनेचा जन्मच संघर्षासाठी झाला असल्याने शिवसेनेला संघर्ष नवीन नाही त्यामुळे या संघर्षातून पुन्हा एकदा शिवसेना उभा राहिल अशी अपेक्षा यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular