अहमदनगर दि.२५ जून
क्लेरा ब्रूस हायस्कुल मैदान परिसरातील सर्व्हे न 353 पैकी एक एकर जागा ही आपल्याच मालकीची असून त्या बाबत कोर्टाच्या आदेशानुसार 27 एकर पैकी एक एकर जागेची पाहणी करून जागेची हद्द निश्चित करून जागेचा ताबा घेण्यात आला असल्याची माहिती मूळ मालक प्रकाश लक्ष्मण कुलकर्णी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे
ager
प्रकाश कुलकर्णी यांच्या वडिलांनी त्यांच्या पत्नी निर्मला लक्ष्मण कुलकर्णी यांच्या नवे सन 1966 साली क्लेरा ब्रूस मैदान येथील जुनी वसंत टॉकीज समोरील दक्षिण पश्चिम कोपरा असलेली नवीन सिटी सर्व्हे नंबर 7443 असा एकूण 27 एकर पैकी एक एकर क्षेत्र मूळ मालक काझी जामरुद्दीन यांच्या कडून दोन हजार मध्ये न्यायालयातील दावा क्रमांक 148/1966 मधील कमिशनर यांच्या आदेशाने झाले आहे.
तसेच अहमदनगर न्यायालयातील डिक्रि दावा क्रमांक 2017 / 1973 मधील निकाला नुसार कोर्टाने नेमून दिलेल्या कमिशनर यांनी 27 एकर पैकी एक एकर जागेची पाहणी करून जागेची हद्द निश्चित केलेली आहे. त्या नुसार सर्व शासकीय कार्यलयाच्या आदेशाने जागेचा ताबा निर्मला कुलकर्णी यांना दिला आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल अपिलावर सुनावणी होऊन 30 एप्रिल 1984 रोजी सदरची खरेदी आणि ताबा बरोबर असल्याचा निकाल दिला होता.
तसेच महाराष्ट्र जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मालमत्ता पत्रकावर निर्मला कुलकर्णी यांचे नाव असून निर्मला कुलकर्णी यांचे 1999 मध्ये निधन झाल्यानंतर वारस म्हणून प्रकाश कुलकर्णी व त्यांचे बहिणीचे नाव लागले आहेत त्यानंतर त्यांनी जमीन सर्व कायदेशीर दस्तावेज करून विक्री आहे मात्र काही लोक आर्थिक लाभ मिळण्याच्या हेतूने या बाबत बदनामी करून अविश्वास उत्पन्न होईल असे कृत्य करत आहे त्यामुळे सदर जमिनीवर कोणाचाही ताबा नसून ही जागा कायदेशीर रित्या विक्री केली असल्याचं मूळ मालक प्रकाश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
” ही जागा आमची असताना आम्ही ती काही लोकांना विकली आहे त्यांच्याकडून या जागेवर सध्या काम चालू असून काही दिवसांपूर्वी ज्या अफवा उडाल्या होत्या की रात्रीच्या वेळेस कोणी तरी लोक ताबा घेण्यासाठी या जागेत घुसले आहे तर ते आमच्या ठेकेदाराचे कामगार असून कोणत्याही लोकांनी बळजबरीने या ठिकाणी ताबा घेतलेला नाही” – प्रकाश कुलकर्णी