औरंगाबाद दि.८ जून
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद मध्ये जाहीर सभा झाली या सभेच्या सुरवातीलाच त्यांनी सांगितले की शिवसेनाप्रमुखांच्या आवडत्या संभाजीनगर मध्ये आलेलो आहे जिथे जिथे नजर जाते तिथं माणसाचं माणसे आहेत. मराठवाड्यामध्ये शिवसेनेचे पहिले पाऊल टाकलं होतं तो आजचा दिवस. संभाजी नगरची पहिली महापालिका आपण जिंकलो होतो तेव्हा शिवसेना प्रमुखांची सभा मी बाजूच्या एका इमारतीच्या गच्चीत बसून पहिली होती. मला अजूनही माझा विश्वास बसत नाही एवढी वर्षे झाली तरी सभेला मैदानाचा कोपरा न् कोपरा भरलेला आहे कुठे काही कमी नाही असं वाटतंय

आकाशातून दृश्य पाहिले तर म्हणजे अक्षरशः देव सुद्धा आपली सभा कशी बघत असेल ते दृश्य मी बघून आलो टीव्ही वर बातम्या सुरू होत्या थोड्याच वेळात मुख्यमंत्री सभास्थानी पोचनार मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणारमुख्यमंत्री कोणावर निशाना साधला आता मला प्रश्न पडला की नेहमी शिवसेनाप्रमुख सांगायचे ढेकूण मारायला तोफेची गरज नसते
संभाजीनगर हे नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे आणि बाळासाहेबांनी दिलेले वचन ते मी पूर्ण करणारच मला नेहमी विचारले जाते औरंगाबादचे नामकरण कधी होणार नामकरण आजही करू शकतो मात्रवमी ते पूर्ण करणार पण मी प्रथम संभाजी नागरकरांना पाणी देणार.
बाबरी पाडायला कोण गेलं होतं त्याबाबत एकदा खरं-खोटं होऊन जाऊ द्या आहे नामवंतांचा हिंदुत्व आम्हाला शिकवू नका पैसा भाजपच्या तीनपाट प्रवक्त्या मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा खराब होत आहे. आपल्या पंतप्रधानांचे फोटो कचराकुंडी वर लावले जात आहे प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घरात ठेवावा घराबाहेर पडताना देशाचा नागरिक म्हणून बाहेर पडावे.