HomeUncategorizedलाव रे तो व्हिडिओ म्हणत ऊबाठा शिवसेनेने खासदार सुजय विखेंवर शहरात राष्ट्रवादीला...

लाव रे तो व्हिडिओ म्हणत ऊबाठा शिवसेनेने खासदार सुजय विखेंवर शहरात राष्ट्रवादीला साथ देत असल्यामुळे साधला निशाणा….मात्र महापालिकेच्या सत्तेत राष्ट्रवादी शिवाय ऊबाठा शिवसेनेला करमेना…

advertisement

अहमदनगर दि.११ ऑक्टोबर

शिवसेना नगर (Shivsena Nager) या फेसबुक पेजवर गेल्या काही दिवसांपासून भाजपचे दक्षिण नगर जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांना लक्ष करण्यात येत असून सुजय विखे यांचे काही जुने व्हिडिओ सध्या या पेजवरून व्हायरल करण्यात येत आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजप सेनेची युती होती त्यावेळी शिवसेना दुभंगलेली नसताना भाजप सेनेच्या युतीमुळे अहमदनगर शिवसेनेने युती धर्म पाळत खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता अहमदनगर शहरातून सुजय विखे पाटील यांना लोकसभेत चांगलेच मताधिक्य मिळाले होते.

अहो दादा तुम्ही दहशत मिटवण्यासाठी केडगाव मध्ये घर घेणार होते…. आणि आता तर केडगाव मध्ये कोतकर यांच्या घरात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले… अशा विविध मथळ्यांखाली शिवसेना नगर या फेसबुक पेजवरून खासदार विखेंना लक्ष केलं जात असून खा.विखे यांचे मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या अनेक भाषणांचे व्हिडिओ सध्या या पेजवरून व्हायरल केले जात आहेत.

मध्यंतरीच्या महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या नव्या सोयरिकीनुसार शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि एक गट भाजपबरोबर जाऊन मिळाला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले असून यामधील एक गट भाजपमध्ये सत्तेत येऊन बसला आहे. त्यामुळे अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे सत्तेत बरोबर असलेल्या अजित पवार गटाबरोबर असल्यामुळे सध्या खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे विविध कार्यक्रमांना एकत्रितपणे हजेरी लावत असतात. नगर शहरात सध्या खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी विविध ठिकाणी विकास कामांचे उद्घाटने करत आहेत त्यामुळे शिवसेना नगर या पेजवरून नकळतपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांना लक्ष केले जात आहे.

मात्र दुसरीकडे अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर असून राष्ट्रवादीचा उपमहापौर आहे तर राष्ट्रवादीच्या टेकूवरच शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या महापौर या नात्याने विकास कामांच्या कार्यक्रमांना महापौरांची ही हजेरी असते त्यामुळे नगर शहर शिवसेना या पेजवरून एकीकडे खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात येत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी बरोबर सत्तेत सहभागी झालेली शिवसेना नगरकर पाहत आहेत त्यामुळे टीका नेमकी कशामुळे होते यावर आता प्रश्नचिन्ह असून एका शिवसेनेच्या दोन भूमिका कशा असू शकतात हेही समजायला तयार नाही. भाजप अथवा राष्ट्रवादीवर टीका करत असताना आपण राष्ट्रवादी बरोबर सत्तेत सहभागी आहोत हे लक्षात येत नसेल का?

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular