अहिल्यानगर दिनांक ७ जून
क्रीडा क्षेत्रात खळबळ माजल अशी एक घटना समोर आली असून अल्पवयीन खेळाडू मुलीशी 25 लाखांचे बक्षीस मिळून देतो असे म्हणून भोपाळला नेऊन लैंगिक अत्याचार करणारा आरोपी मोकाट असल्याने त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी बहुजन समता पार्टीचे प्र.उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी केली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत तालुक्यातील मातंग समाजातील 17 वर्षीय अल्पवायीन मुलीला श्रीलंकेला खेळावयास घेऊन जाऊन 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळवून देतो. पोलिसात मोठ्या पदावर नोकरी लावून देतो. अशी खोटी आश्वासने देऊन रमेश गांगर्डे, आणि शिवाजी वाबळे, अंकुश भैडेकर यांनी कर्जत येथून एका अल्पवयीन खेळाडूची फसवणूक केल्या असल्याचा प्रकार झाला असल्याची माहिती वसंतराव सकट यांनी दिली आहे.
मातंग समाजातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी कब्बडी व कुस्ती खेळाडू गाव तालुका जिल्हा विभागात खेळत होती. या मुलीला परदेशात खेळायला नेतो असे सांगून तिला कर्जत वरून नेवासा येथे नेण्यात आले. यावेळी तिचा वाढदिवस साजरा करून तिला गुंगीच्या औषध पाजून विविध गुंगी येतील अशी पेय पाजून आणि पदार्थ खाऊ घालून तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. अशी माहिती सकट यांनी दिली आहे.
त्यानंतर शिवाजी वाबळे याने आपल्या स्कॉर्पिओ गाडीत बसून त्या मुलीला भोपाळच्या दिशेने घेऊन गेला. त्यावेळी त्या खेळाडू मुलीने इतर मुली कुठे आहेत असे विचारल्यानंतर इतर मुलींची गाडी मागेच आहे ती येत असल्याची माहिती दिली. भोपाळ येथे गेल्यानंतर त्या मुलीला दिलेल्या रूममध्ये जाऊन संबंधित मुलीवर पाच दिवस अत्याचार केल्याचे सकट यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
त्यानंतर तुला जर श्रीलंकेला जायचे असेल तर तुला प्खाजगी अकॅडमी मध्ये प्रवेश करावा लागेल आणि तुला पुण्यालाच तुझ्या नातेवाईकांकडे राहावे लागेल असा सल्ला देण्यात आला. आणि मी बोलावेन तेव्हा येण्याचे कबूल करून घेतले व सांगितल्याप्रमाणे न केल्यास तुझ्या भावाला उचलून नेईल अशी धमकी त्या अल्पवयीन मुलीला देण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक क्षण वाबळे म्हणेल तसे वागून लैंगिक अत्याचार ती अल्पवयीन मुलगी सहन करीत होती.
अखेर या प्रकरणी पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून. अंकुश यास पोलिसांनी अटक केली होती तर त्या अल्पवयीन खेळाडू मुलीची पंधरा दिवसांसाठी सुधारगृहात रवानगी केली होती. सुधारगृहातून परतल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीने आपले आई-वडील काका व मामा यांना सविस्तर माहिती देऊन तिच्यावर झालेल्या अत्याचारा बाबत खरी माहिती दिली. त्यावरून कलम 164 प्रमाणे न्यायालय मध्ये त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला असून. शिवाजी वाबळे, रमेश गागर्डे, यांचेवर गुन्हे दाखल करून कार्यवाही व्हावी अशी मागणी बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसतराव सकट यांनी केलीय.
या बाबत पोलीस आपायुक्त संदीप डोईफोडे यांची पीडित मुलगी, आई, वडील मामा व नातेवाईक यांचे समवेत भेट घेऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर वाकड पोलिसांनी 137/2 अन्वये गुन्हा दाखल केला त्यानंतर 363,366 वाढीव कलम लावले असून बहुजन समता पार्टीचे सततच्या पाठपुराव्यामुळे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 312MM), 3(2)(va) अन्वये गुन्हा दाखल करून सदर तपास पो. सह. आयुक्त हिंजवडी कुन्हाडे यांचेकडे वर्ग केला आहे.
3 महिने होत आले तरीही सेस्क कॅण्डलचा मुख्य मास्टर माईड शिवाजी वाबळे व रमेश गांगर्डे खुले आम फिरत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या कुटुंबवार दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांची संपूर्ण कुटुंबाची आत्महत्तेपर्यंतची मानसिकता झाली आहे. त्यामुळे सदर आरोपीवर कार्यवाही करावी अन्यथा बहुजन समता पार्टीचे वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री तथा गृहमंत्री,समाजकल्याण मंत्री,जिल्हाधिकारी पुणे आणि अहिल्यानगर, पोलीस आयुक्त पिंप्री चिंचवड,पोलीस सह आयुक्त हिंजवडी यांना देण्यात आलेल्या आहेत.