HomeUncategorizedआजचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि देशाला नवी दिशा दाखवणारा: खा....

आजचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक आणि देशाला नवी दिशा दाखवणारा: खा. डॉ. सुजय विखे पाटील

advertisement

अहमदनगर दि.१ फेब्रुवारी
आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाचा आजचा अर्थसंकल्प हा भारत देशाला नवी दिशा दाखवणारा असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

आज वेगाने नव्या उंचीवर जाणाऱ्या अर्थव्यवस्थेत भारतातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला दिलेले प्राधान्य जनसामान्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक असून देशाच्या सर्वांगीण विकासाला प्रगतीमान बनवेल असे देखील मत त्यांनी मांडले.

विशेष म्हणजे विकासाची दिशा सांगणारा आणि महिला, शेतकरी, गरिब, युवा या विकसित भारताच्या चार स्तंभांना सक्षम करणारा हा अर्थसंकल्प संकल्प असून निश्चितच विविध क्षेत्र हे सक्षम बनतील असे स्पष्ट करून त्यांनी आजचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून विशेष आभार मानले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular