अहमदनगर दि. – १ फेब्रुवारी
नगरच्या क्लेराब्रुस हायस्कूलच्या मैदानावर दिनांक 3 फेब्रुवारी रो दुपारी ३ वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण बचाव महाएल्गार मेळावेचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळावासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते ना.
छगनरावजी भुजबळ, विरोधी पक्षनेते ना. विजयजी वडेट्टीवार, आ.गोपीचंदजी पडळकर, माजी
मंत्री महादेवजी जानकर, आ.प्रकाशजी शेंडगे, आ.रामजी शिंदे, कल्याणरावजी दळे, प्रा.लक्ष्मणराव
गायकवाड, शब्बीरभाई अन्सारी, पी.टी. चव्हाण, दौलतराव शितोळे, सत्संगजी मुंढे, लक्ष्मणराव
हाके आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे.
सुधाकर आव्हाड,अंबादास गरुडकर,अनिल निकम, दादाभाऊ चितळकर,रमेश सानप,प्रकाश सैनदर, छायाताई नवले,हरिभाऊ डोळसे,अरविंद धिरडे,यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मेळाव्याची माहिती दिली
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नव्हता व नाही परंतु ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दयावे. अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ओबीसी समाजाची होती व आहे. परंतु मराठा आरक्षणाचा मसुदा जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात यामुळे तीव्र असंतोष व अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तसेच एक प्रकारची अन्याय झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये ओबीसींचा पहिला भव्य मेळावा होणार आहे. ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. अशी आग्रही मागणी ओबीसी समाजाच्या वतीने पुढे करण्यात येत आहे.
या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून लाखोंच्या संखेने
ओबीसी समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या मेळासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था
करण्यात आली आहे. नगर शहरातील पार्किंगची व्यवस्था पांजरपोळ मैदान, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर पुतळा जवळ, मार्केट यार्ड चौक, YMC मैदान, खालकर हॉस्पिटल जवळ, अहमदनगर
बॉईज हायस्कूल मैदान, कोठी रोड, येथे करण्यात आलेली आहे. तसेच सभेच्या ठिकाणी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, आरोग्य व्यवस्थेसाठी रुग्णहिकेची व्यवस्था केलेली आहे. लोकनेते कै.बबनराव ढाकणे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. तरी या महाएल्गार मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.