HomeUncategorizedछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या युवकाचा कापड बाजार येथे...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या युवकाचा कापड बाजार येथे पुतळ्याचे दहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दुग्धभिषेक

advertisement

अहमदनगर दि ६ ऑगस्ट:
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मुकुंदनगर येथील युवकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले असून ती ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कापड बाजार येथे देशद्रोहाचा पुतळा दहन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दूधअभिषेक करण्यात आले. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, विनीत पाऊलबुद्धे, प्रकाश भागानगरे,अभिजीत खोसे, संजय चोपडा, बाळासाहेब बारस्कर,सुनील त्रिंबके, विपुल शेटिया, अजिंक्य बोरकर, संभाजी पवार, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, सागर गुंजाळ, मळू गाडळकर, बाळासाहेब जगताप, राम धोत्रे, सुमित कुलकर्णी,मंगेश खताळ, ऋषिकेश ताठे, सुरेश बनसोडे, मयूर कुलथे, माऊली जाधव, प्राध्यापक अरविंद शिंदे,अतुल कावळे, गजेंद्र भांडवलकर, सोनू घेमूड, भैय्या पवार, अतुल कावळे, राजेंद्र एकाडे, राजेश भालेराव, गजेंद्र दांगट,धीरज उकिर्डे, मयूर सोमवंशी , शुभम टाक,गिरीश भामरे,विशाल भिंगारदिवे, दादा दरेकर, दीपक नवलानी,अभिजीत खरपुडे विशाल मांडे, प्रसाद गांधी,चेतन चव्हाण आदी उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी शहरातील काही अपप्रवृत्तीने बेताल वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखविण्याचे काम केले जात आहे. महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करणारे लोक थांबायला तयार नाहीत. त्यांच्यावर शासनाने देशद्रोहाचा खटला दाखल करून कडक शासन करावे. याच्या पाठीमागील टीमचा शोध घ्यावा. महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या कुटुंबियांवर देखील कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular