Homeविशेषगोर गरीबांच्या हाडोळ्याच्या जागा खोटे नाटे कागदपत्र तयार करून बाळकावतोय "तो" भूखंड...

गोर गरीबांच्या हाडोळ्याच्या जागा खोटे नाटे कागदपत्र तयार करून बाळकावतोय “तो” भूखंड माफिया.. त्याला साथ नेमकी कोणाची?

advertisement

अहमदनगर दि. 2 ऑक्टोबर

अहमदनगर शहरात गोरगरिबांच्या जागा बळकवण्याचे प्रकार आता काही नवीन राहिलेले नाहीत अनेक ठिकाणी भूखंड माफियांनी गोरगरीब जनतेच्या मोकळ्या जागांवर, घरांवर,फ्लॅटवर ताबा मारण्याचे प्रकार आता राजरोसपणे सुरू झाले आहेत. या भूखंड माफियांनी कब्रस्तानही पुरत नाही असेच काही प्रकारावरून आता समोर येऊ लागले आहे.

नगरमध्ये हाडोळा म्हणजेच सरकारकडून ठराविक समाजाला इनामी जागा दिल्या जात होत्या त्या इनामी जागा आता शहराच्या मध्यवस्तीत आल्यामुळे या जागांना प्रचंड भाव आला आहे. या जागा सहजासहजी विकल्या जाऊ शकत नाहीत सरकारचा नजराणा भरून अनेक कायदे कसा काय मधून बाहेर पडून ही जमीन विकली मात्र नगर मध्ये एक असा भूखंड माफिया होऊन गेला आहे की ज्याने स्वतःच्याच घरात जागा खरेदी विक्रीचे ऑफिस उघडले होते अशी चर्चा त्याकाळी होत असे तो आता स्वर्गवासी झाला आहे मात्र त्याने असे अनेक कागदपत्र तयार करून ठेवले आहेत हे जेणेकरून अनेकांच्या जागेवर त्याचे नाव लागले गेले आहेत कारण एका छाप्यात त्याच्या घरून उपाधिबंधक कार्यालयातील अनेक महत्त्वाचे शिक्के सापडले गेले होते. त्या कागदपत्रांच्या आधारे आता अशा जागांवर काही ठराविक भूखंड माफीयांचा यांचा डोळा आहे. गोरगरीब जनतेला सरकारकडून जागा दिल्या जात होत्या आणि त्या जागेत शेती करून त्यांचे जीवन सुरळीत चालावे चा त्याकाळी सरकारचा उद्देश होता. अत्यंत गरीब असलेल्या लोकांना जागा दिल्या होत्या मात्र या जागा घेऊन काही भूखंड माफियांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून अशा जागा गगिळंकृत सपाटा लावला होता.

या जागा जेव्हा मूळ मालकांकडून भूखंड माफियांना काही शेकडो रुपयांच्या मोबदल्यात लिहून दिल्या गेल्या होत्या तेव्हा त्या लोकांची तत्कालीन परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे त्यांनी अगदी 100 आणि 50 रुपयांवर जागा गहाण ठेवल्या होत्या आणि एक भूखंड माफिया जो या कामात चांगलाच तरबेज होता त्याने अनेक लोकांना त्या वेळी विविध कागदपत्रांवर अंगठे घेऊन त्यावर मजकूर लिहून या जागेवर अनेक वर्षांपासून ताबे मारून ठेवले आहेत. काही कालानंतर मूळ जागा मालकांच्या इतर नातेवाईकांनी आणि पुढे आलेल्या त्या कुटुंबातील वंशजानी ही जागा चांगल्या भावात विकली तेव्हा एक सत्य बाहेर आले जेव्हा जागा विकली जाते तेव्हा हा भूखंड माफिया आणि आता त्याचा मुलगा जुने स्टॅम्प पेपर आणि काही कागदपत्रे दाखवून आपणच याचे मालक असल्याचे दाखवतो आणि ती जागा कायदेशीर कचाट्यात कशी सापडेल हे पाहून समोरच्याला गुंतवून ठेवतो असे अनेक प्रकरण नगर शहरात घडत असून या भूखंड माफिया मागे काही अदृश्यपणे राजकीय हात असल्यामुळे हा भूखंड माफिया सध्या जोरात आहे. कुणी जागा विकली अथवा कंपाउंड टाकले की हा भूखंड माफिया आपल्या गुंडांकर्वी त्याठिकाणी कंपाउंड तोडून समोरच्याला मानसिक त्रास देतो किंवा कायदेशीर नोटीसा पाठवून समोरच्याला घाबरवण्याचे काम सध्या हा भूखंड माफिया करत आहे.

मात्र अदृश्य हात असलेले राजकारणामुळे हा नेहमीच कायद्याच्या कचाट्यातून हा वाचत राहतो मात्र म्हणतात ना भगवान के घर दर होती है मगर अंधेर नही…तासा आता त्याचा विनाश जवळ आलेला आहे आणि हा भूखंड माफियाचे लवकरच नगरकरांच्या समोर त वस्त्रहरण होणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular