HomeUncategorizedअहमदनगर शहराच्या राजकारणातील मोठी घडामोड या आमदाराने दिली तडकाफडकी पक्ष आणि आमदारकीला...

अहमदनगर शहराच्या राजकारणातील मोठी घडामोड या आमदाराने दिली तडकाफडकी पक्ष आणि आमदारकीला सोडचिठ्ठी

advertisement

अहमदनगर दि.१ एप्रिल

अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवरच येऊन ठेपली असून डिसेंबर महिन्यात ही निवडणूक होत असल्याने आता या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सर्वच पक्षातील नेते तयारीला लागलेले आहेत याची प्रचिती रामनवमीच्या मिरवणुकीच्या दरम्यान समोर आली आहे. त्यामुळे आता राजकीय गोटा मध्ये  अनेक धक्कादायक राजकीय घटना घडत असून महानगरपालिकेच्या आणि आगामी लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोरदार व्हावे लागले आहेत. त्यामुळे आता एकेकांचे कट्टर विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे.

कर्जत जामखेड मध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि विधान परिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांचे मनोमिलन झाले असून दोघेही एकत्रितपणे जामखेड कर्जतचा विकास करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अटलांटिका येथे ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलताना दिला आहे

त्याचप्रमाणे पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे यांच्यामधील कटूता संपले असून पुढील वेळेस सुजय विखे हे राजकारणातून संन्यास घेणार असून त्यामुळे खासदारकीसाठी निलेश लंके यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची ग्वाही खुद्द लंके यांनी दुबई येथील बाजार समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान बोलताना दिली आहे यावेळी विखे आणि लंके एकत्र उपस्थित होते.

तर अहमदनगर शहरातही अनेक राजकीय घडामोडी रात्रीतून घडले असून भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत तर शिवसेनेचे काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीचे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अ खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.

r

तसेच अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासनाला नगर शहरातील अनेक प्रश्न सोडवता न आल्याने नागरिकांच्या रेटाने आणि मागणीमुळे महानगरपालिकेची पुन्हा विभाग वारी ग्रामपंचायतची घोषणा केली असून अहमदनगर शहरात आता पाच ते सहा ग्रामपंचायती 1 एप्रिल पासून अस्तित्वात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यामुळे सर्व राजकारणांच्या मन्सूब्यांवर पाणी पडले आहे त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक होणारच नाही अशी अ खात्रीशीर माहिती मिळतेय.

अहमदनगर शहराचे आमदार पक्ष सोडून नव्यानेच महाराष्ट्रात उदयास येत असलेल्या भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करणार असल्याची अ खात्रीशीर माहिती मिळतेय 

नगर शहरातील शिंदे गटातील अनेक जण आरपीआय मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे

 

 

 

आज एक एप्रिल आहे …टेन्शन घेऊ नका.. एप्रिल फुल

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular