HomeUncategorizedतोफखाना हद्दीतील गुंडगिरी वाढण्यास कारणीभूत असणारे तोफखाना पोलीस निरीक्षकांचे निलंबन करा -...

तोफखाना हद्दीतील गुंडगिरी वाढण्यास कारणीभूत असणारे तोफखाना पोलीस निरीक्षकांचे निलंबन करा – अभिजीत खोसे

advertisement

अहमदनगर दि.३ ऑगस्ट
अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढती गुंडागिरी आणि त्यामधून होणारे हल्ले आणि खून यामुळे नगर शहराचे स्वास्थ बिघडले आहे. अहमदनगर शहरात गेल्या तीन महिन्यात तीन खून झाल्याने नगर शहरातील कायदा सुव्यवस्था डबघाईला आली का काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज अहमदनगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज समोर एका कॉलेज तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याचा प्रकार घडल्यानंतर कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. शुल्लक कारणावरून थेट कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी झालेला युवराज गुंजाळ यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मात्र अहमदनगर शहरात खुल्या हत्यार घेऊन फिरण्याची हिंमत ही कोणत्या कारणामुळे होते हाही एक प्रश्न आहे पोलिसांचा धाकच नगर शहरातील गुंडांवर राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित करत तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांचे तातडीने निलंबन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत खोसे यांनी केली आहे. अभिजीत खोसे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी युवराज गुंजाळ याची भेट घेतली यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना वेळोवेळी निवेदन देऊन शहरातील गुंडागर्दी कमी करावी अशी मागणी केली होती मात्र तरीही शहरातील अनेक तरुणांकडे आजही दुचाकी वाहनांमध्ये धारदार शस्त्रे मिळत आहेत विशेष करून तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असे प्रकार वाढल्याने तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांचे निलंबन करावे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular