अहमदनगर दि.२ ऑगस्ट
अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून आणि मारामारी याच्या घटना वाढल्या आहेत गेल्या तीन महिन्यात तीन खून झाल्याने शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आज पुन्हा नगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज महाविद्यालयाच्या समोर एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे यामध्ये महाविद्यालयीन तरुण युवराज गुंजाळ हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
अहमदनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि भरवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कॉलेज समोर हा हल्ला झाल्याने कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते तर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही हा प्रकार काय आहे हे समजले नसल्याने काही काळ गोंधळ उडाला होता ही घटना समजताज तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे हल्लेखोर पसार झाले असून ते कोण होते याबाबत पोलीस माहिती घेत आहेत. ही हल्ल्याची घटना शहर वाहतूक बस मध्ये सीटवर बसण्याच्या कारणातून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.