अहमदनगर दि . ७ डिसेंबर
तृतीयपंथींनी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी महनगर पालिकेच्या महासभेत तृतीयपंथीसह मेहतर, पारधी समाजास स्मशानभूमीसाठी जागेचा ठराव मंजूर करण्यात आला होता .
तृतीयपंथी नागरिक गेल्या 15 वर्षांपासून हक्काच्या
स्मशानभूमीसाठी लढा देत होते. परंतु, त्यांच्या लढ्याला यश येत नव्हते. त्यांनी आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे
स्मशानभूमीच्या जागेसाठी पाठपुरावा केला होता.
नालेगावमधील सर्व्हे नं. 221 मध्ये बेवारस व्यक्तींच्या
अंत्यविधीसाठी 73 गुंठे जागा आरक्षित आहे. त्यातील
15 गुंठे जागा तृतीयपंथी समाजास देण्याचा निर्णय
झाला महासभेत झाला होता. मात्र आता समजलेल्या माहितीनुसार महासभेत ज्या जागेवर चर्चा झाली ती जागा तृतीयपंथांना न देता सावेडी येथील कचरा डेपो जवळील एका जागेत तृतीयपंथांना स्मशानभूमीसाठी जागा देणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
महासभेत नालेगाव मधील जागा देण्यावरून चांगलाच गदारोळ झाला होता. मात्र आता प्रत्यक्षात जेव्हा जागा देण्याची वेळ आली तेव्हा जागा बदलण्यात आली असून सावेडी येथील स्मशानभूमीची जागा देण्याचा ठराव कधी झाला आणि कोणी केला यावर प्रश्न उपस्थित राहतोय यावरून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की महासभेत जे दिसतं ते प्रत्यक्षात नसतं असाच काहीसा संदेश या जागेच्या प्रश्नावरून समोर आला आहे.