मुंबई १८ जुलै
एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांची आज महत्त्वाची बैठक झाली. यानंतर शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत पक्षप्रमुख पदाचा उल्लेख नाहीये, मात्र इतर पदांची आणि त्यावर नियुक्त नेत्यांची नावं शिंदे गटाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेतील अनेक नेत्यांवर कारवाई केली जात असतानाच शिंदे गटाकडून आता ही नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.