Home Uncategorized फुटला त्याला फोडला!” शिवसेनेतून बंडखोरी केलेल्यांसाठी नगर मधील या महिला शिवसैनिकाचा इशारा

फुटला त्याला फोडला!” शिवसेनेतून बंडखोरी केलेल्यांसाठी नगर मधील या महिला शिवसैनिकाचा इशारा

अहमदनगर दि.४ ऑगस्ट

पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर १० ते १२ जणांनी हल्ला केला होता या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाला. यावेळी ”गद्दार-गद्दार” अशी घोषणाबाजीही करण्यात आली. आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर तेथून उदय सामंत ताफा जात होता. यावेळी सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांसह काही कार्यकर्त्यांना अटकही केली आहे. मात्र आता या फोडा फोडीचे लोन पसरत चालले आहे.

शिवसेनेचे हिंगोलीचे जिल्हाप्रमुख बबनराव थोरात यांनी आपल्या भाषणात जे गद्दार शिवसेना सोडून गेले त्यांच्या गाड्या आपल्या मतदारसंघात आले तर फोडा असं आवहान केलं होतं. त्यानंतर औरंगाबाद मध्ये काही ठिकाणी गद्दारी करणाऱ्यांची गाडी फोडा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा असे फ्लेक्स बोर्ड ही लावण्यात आले होते. त्यामुळे आता शिंदे गटाविरुद्ध अनेक शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.

अहमदनगर जिल्ह्याच्या शिवसेनेच्या माजी महिला संघटक स्मिता अष्टेकर यांनीही सोशल मीडिया वरून आता एक मेसेज व्हायरल केला असून “पुण्यातछोटासा टिजर प्रदर्शित झालाय. संपूर्ण महाराष्ट्रात थेट प्रक्षेपण लवकरच चालू होईल! चित्रपटाचे नाव आहे “फुटला त्याला फोडला!” सुरुवात नगर जिल्ह्यापासून होईल.” असा मेसेज त्यांनी शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांसाठी आपल्या फेसबुक अकाउंट वर दिला आहे. त्यामुळे पुन्हा आता अहमदनगर जिल्ह्यातही उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध शिंदे समर्थक यांची धूमचक्री पाहायला मिळेल असे चिन्ह दिसतंय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version