Homeराजकारणखा.संजय राऊत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ खासदार अरविंद सावंत यांचा...

खा.संजय राऊत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पाठोपाठ खासदार अरविंद सावंत यांचा ग्रीन सिग्नल… विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कडे येणार असून तयारी लागण्याचे दिले आदेश ..

advertisement

अहमदनगर दि.१३ ऑगस्ट

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीमध्ये अहमदनगर शहर विधानसभेची जागा कोणाला मिळणार याबाबत चांगली चर्चा सुरू आहे महाविकास आघाडी मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्रपवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षाकडून अहमदनगर शहराची जागा आपल्यालाच मिळणार असा दावा करण्यात येत आहे आणि त्या दृष्टीने तिन्ही पक्षातील इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मात्र अहमदनगर शहर विधानसभेची जागा पारंपारिक पणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे होती आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यानंतर या जागेवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे दावा करू लागले आहेत गेल्या पंचवीस वर्षांपासून अहमदनगर शहरात स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांच्या माध्यमातून शिवसेनेने भगवा फडकत ठेवला होता त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळेल अशी अपेक्षा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. श्रीगोंदा येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आले असताना अहमदनगर शहराच्या जागेबाबत चर्चा होऊन खासदार संजय राऊत यांनी नगर शहर विधानसभेची जागा आपलीच आहे कामाला लागा असा आदेश दिला असल्याचं शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले होते.त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेऊन अहमदनगर शहराच्या जागेबाबत चर्चा केली होती त्याबाबतही स्वर्गीय आमदार अनिल राठोड यांनी केलेले काम आणि नगर शहरावर शिवसेनेची असलेली पकड लक्षात घेता शरद पवार यांनी शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांना नगर शहर विधानसभेबाबत ग्रीन सिग्नल दिला असल्याचं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी सांगितले आहे. तसेच आज खासदार अरविंद सावंत अहमदनगर शहरात आले असताना त्यांनीही शिवसैनिकांना नगर शहर विधानसभा जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागा सर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा भगवा झेंडा फडकवायचा आहे असा संदेश दिला असल्याची माहिती गिरीश जाधव यांनी दिली आहे.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सध्या अनेक जण इच्छुक आहेत मात्र अहमदनगर शहर विधानसभेची जागा ही एखाद्या महिलेला अथवा ज्येष्ठ नेत्याला जाऊ शकते अशी खात्रीशील माहिती ही मिळाली असून त्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अचानकपणे वेगळा चेहरा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून समोर येऊ शकतो हा धक्काही शिवसेना ऐन वेळेस देऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular