Homeराज्यकुस्तीगीर शिस्तभंग कारवाई पाठोपाठ आता कुस्ती केंद्रावर शिस्तभंग कारवाई होणार , कुस्तीगीर...

कुस्तीगीर शिस्तभंग कारवाई पाठोपाठ आता कुस्ती केंद्रावर शिस्तभंग कारवाई होणार , कुस्तीगीर संघाकडुन परीपत्रक जारी – पै. योगेश दोडके..

advertisement

पुणे दिनांक 25 मार्च
६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धा फुलगाव येथे झालेली असताना तसेच त्या स्पर्धेतील प्राविण्यधारक कुस्तीगीरांना शासकीय मानधन मंजुर झालेले असताना सुध्दा म.रा.कुस्तीगीर परिषद व आमदार श्री रोहीत पवार हे जाणुन बुजून कुस्तीगीरांमध्ये संभ्रम तयार करण्यासाठी व ६६ व्या महाराष्ट्र केसरी बाबत आयुष्यभराचा वाद निर्माण करण्याच्या हेतुन कर्जत येथे पुन्हा ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करत आहेत. वास्तविक भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र शासनची या स्पर्धेस मान्यता नसतानाही चुकीच्या पध्दतीने ही स्पर्धा आयोजित होत असल्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने या स्पर्धेस बोगस व नामसदृष्य असे म्हणले असुन महाराष्ट्रातील कुस्तीगीरांना या स्पर्धेत सहभागी होऊ नये अशा सुचना केलेल्या आहेत जे कुस्तीगीर सुचनेचा अनादर करुन या स्पर्धेत सहभागी होतील अशा कुस्तीगीरांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भातील सुचना परिपत्रक काढुन जाहीर केलेली आहे .

महाराष्ट्रातील काही कुस्ती केंद्र व तालमीचे संस्था चालक जाणुन बुजून वादविवाद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातुन व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने काढलेल्या परीपत्रकाचा अवमान करण्याच्या हेतुने कर्जत येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वी करु पहात असुन जाणीवपूर्वक ते आपल्या केंद्रातील कुस्तीगीरांना स्पर्धेत सहभागी करु पहात आहे. अशा कुस्ती केंद्रातील संस्था चालकांसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आज परीपत्रक काढुन काही सुचना जारी केल्या असुन ज्या कुस्ती केंद्रातील कुस्तीगीर जास्त प्रमाणात कर्जत येथील बोगस महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होतील अशा कुस्ती केंद्रातील कुस्तीगीर हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या लाभाच्या कोणत्याच योजनेसाठी पुढील ३ वर्ष पात्र राहणार नाहीत .

कुस्तीगीर संघाच्या भविष्यातील लाभाच्या योजना
१ ) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ राष्ट्रीय पदक विजेते व आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभागी कुस्तीगीरांना दरवर्षी रोख बक्षीस देऊन सन्मान करणार आहे ..
२) कुस्तीगीर संघाच्या वतीने काही फाऊंडेशन व कंपणी कुस्तीगीरांना स्पाॅन्सर म्हणुन काही विशिष्ट रक्कम दर महीन्यास देणार आहे .
३) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडुन राज्यात प्राविण्यधारक कुस्तीगीरांसाठी सराव शिबिरे आयोजित केली जाणार आहे .
४) म.रा.कुस्तीगीर संघ मिशन ऑलिंपिक योजनेच्या माध्यमातून काही विशिष्ट कुस्तीगीरांना परदेशी सरावासाठी पाठवणार आहे…

कळावे आपला
पै.योगेश दोडके
सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular