पुणे दिनांक 21 फेब्रुवारी
अहिल्यानगर पुणे महामार्गावरील लोणीकंद येथील एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.या प्रकरणी मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे.
श्री साई लॉजवर छापा टाकला असता पोलिसांना आल्याचे पाहून पळून जाणार्या प्रकाश शेट्टी याला पोलिसांनी पकडले. तेथे २३ वर्षाच्या मुलीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. ही तरुणी मुळची त्रिपुरा येथील आहे.
याबाबत युनिट ४ च्या पोलीस अंमलदार मयुरी नलावडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रकाश रामा शेट्टी (वय ३२, रा. श्री साई लॉज, लोणीकंद) याला अटक केली आहे. तर संतोष हेगडे, प्रज्योत हेगडे आणि ओम माने (रा. श्री साई लॉज, लोणीकंद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, पोलीस हवालदार एकनाथ जोशी, विठ्ठल वाव्हळ, पोलीस अंमलदार नागेशसिंग कुंवर, देविदास वांढरे यांच्या पथकाने केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार तपास करीत आहेत.