अहमदनगर दि22 डिसेंबर-
अहमदनगर पहिली मंडळी सी.एन. आय.तरुण संघाच्या वतीने ख्रिसमस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले होते.
संपूर्ण अहमदनगर शहरातून ही रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये सर्वजण अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते व सर्वांनी ख्रिस्त जन्मोत्सवाच्या शुभेच्छा अहमदनगरकरांना दिल्या. तसेच या रॅलीसाठी मंडळीचे आचार्य रेव्ह.जे. आर. वाघमारे,खजिनदार सॅम्युएल खरात, सेक्रेटरी अमोल लोंढे, कार्यक्रम समिती अध्यक्ष राहुल थोरात प्रसन्न शिंदे,श्रीकांत गायकवाड गिरीश शिरसाठ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महिला मंडळ,संडे स्कूल, ज्येष्ठ सभासद संघ अत्यंत उत्स्फूर्तपणे रॅलीमध्ये सहभागी झाले तसे सुधीर जाधव तरुण संघ ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.