अहमदनगर दिनांक 15 फेब्रुवारी
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालयासमोर दोन चार चाकी वाहनांची जोरदार धडक झाली पारिजात चौकाकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH06- AH – 6206 या कार ने उभ्या असलेल्या होंडा सिटी कारला जोरदार खडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की एखादा बॉम्ब फुटल्यासारखा आवाज व्हावा इतका मोठा आवाज आल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी रोडवर धाव घेतली होती. शाळा सुटण्याची वेळ झाली होती मात्र ही धडक झाल्यानंतर काही सेकंदातच शाळा सुटली त्यामुळे मोठी घटना घडली नाही मात्र जर काही मिनिटांच्या अंतराने ही धडक झाली असती तर मोठा अनर्थ घडू शकला असता कारण ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी आनंद विद्यालयातील विद्यार्थी घरी जाण्यासाठी रोडवरून जात असतात मात्र काही मिनिट आधीचा अपघात झाला.
भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कार मधील तरुण काही नशा करून गाडी चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते. गुलमोहर रोडचे काम सध्या अर्धवट झाले असून हा रोड चांगला झाल्यामुळे आणि रोडवर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे या रोडवर वाहने सुसाट धावत असतात मात्र किमान शाळा परिसरात गतिरोधक बसावेत अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
अहमदनगर शहरात भरधाव कार चालवणे दुचाकी चालवणे हे आजकाल फॅशन झाली आहे. बुलेट या वाहनाला फॅशनेबल सायलेन्सर लावून विचित्र आवाज काढणे हे तर गुलमोहर रोडवर सर्रास सुरू असते मात्र पोलिसांनी याकडे लक्ष देणेही गरजेचे आहे तसेच या अपघातात झालेल्या तरुणांची वैद्यकीय चाचणी गरजेचे असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शनी नागरिकांनी सांगितले आहे.