HomeUncategorizedदेशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या वीर माता पत्नींची हेळसांड थांबेना हुतात्मा झालेल्या जवानांचे...

देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या वीर माता पत्नींची हेळसांड थांबेना हुतात्मा झालेल्या जवानांचे पदक छातीला लावून मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा वीरमाता पत्नींचा इशारा..

advertisement

अहमदनगर – दि.२ एप्रिल
सीमेवर रक्षण करताना अनेक जवानांना हुतात्म्य पत्करावे लागते देशासाठी जवान आपले प्राण पणाला लावून हसत वीरमरण पत्करतो जवानाला लढत असताना मृत्यू आल्यानंतर त्याच्या कुटुंबासाठी सरकार अनेक घोषणा करते अनेक राज्यकर्ते आश्वासन देतात मात्र प्रत्यक्षात ते आश्वासन अमलात कधीच येत नसल्याच सत्य समोर आले आहे.वर्षानुवर्ष सरकार दरबारी चकरा मारूनही वीर जवानांच्या पती-पत्नींना मदत मिळत नसल्याने याबाबत गंभीर्याने विचार करावा अशी मागणी वीर पत्नींनी केली आहे.

अहमदनगर शहरातील प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या वीर माता पत्नी आणि पित्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शहीद झालेले जवान तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांना जर सैनिक भरती प्रशिक्षण तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायचा असला तर त्यांना नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण प्रहार सैनिक कल्याण संघाच्या वतीने आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने देणार असल्याची घोषणा यावेळी प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष विनोद सिंग परदेशी यांनी केली आहे. आणि वीर झालेल्या जवानांच्या कुटुंबाला न्याय मिळत नसल्याने वीर जवानांना मरणोत्तर मिळालेली पदके छातीला लावून वीर जवानांचे कुटुंब मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

नाशिक जळगाव धुळे जिल्ह्यातील वीर माता पत्नी आणि त्यांच्या कुटुंबिया देवदर्शनासाठी शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे दर्शन घेऊन कर्जत कडे जात असताना अहमदनगर शहरातील प्रहार अकॅडमीचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला फुलांच्या वर्षावात आणि सन्मानपत्र देऊन वीर माता पित्यांचा सत्कार केल्यामुळे अनेक मातांच्या डोळ्यामुळे डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते या वीर मातांनी प्रहार अकॅडमी ला भेट दिल्याने मोठेपण मोठे पुण्य आपल्याला मिळाले असल्याचं विनोद सिंग परदेशी यांनी यावेळी बोलताना सांगितले

देशाच्या सेवेत लष्करात असणाऱ्या आपल्या मुलाला सीमेवर लढताना वीरमरण येऊन 23 वर्ष झाले असून अजूनही सरकारकडून मदत मिळवण्यासाठी झगडत असल्याचं नाशिक जिल्ह्यातील येवला येथील रहिवासी असणाऱ्या सुमनबाई तनपुरे या वीर मातेने आपली व्यथा व्यक्त केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular