Homeशहरराजकारण्यांमुळे शहर होत चालले आहे विद्रूप.. ना शिस्त ना भीती ......

राजकारण्यांमुळे शहर होत चालले आहे विद्रूप.. ना शिस्त ना भीती … मतांच्या बेरजेसाठी राजकारण्यांनी शहर दिले अतिक्रमणांना आंदण…. सर्वसामान्य नगरकर मूकपणे सहन करतोय सर्व गोष्टी….

advertisement

अहमदनगर दिनांक 25 ऑगस्ट
अहमदनगर शहर हे खड्ड्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते तसेच चेष्टेने चांदबेबी आली तरी ती बिंदकपणे शहरात फिरू शकते असेही बोललं जायचं मात्र आता या गोष्टी हळूहळू बदलू लागल्या आहेत. शहरातील सर्वच रस्त्यांची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून काही दिवसातच संपूर्ण शहर हे सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे शहर म्हणून ओळखले जाणार आहे. मात्र हे होत असताना दुसरीकडे शहरातील रस्त्यांवरच अतिक्रमणे होत आहेत शहर अत्यंत छोट आहे मात्र जर शहरात चार चाकी घेऊन फिरायचे ठरले तर मोठ-मोठे अडथळे या रस्त्यांवर पाहायला मिळतात मात्र हे हटवण्यासाठी महानगरपालिका अतिक्रमण विभाग फक्त कारवाईचा फार्स करताना दिसतो खरंतर बिचारे करणार काय कारण त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे फक्त अतिक्रमण विभाग हा नावालाच आहे अतिक्रमण विभागातील कर्मचारी आणि तेथील वाहने शहरात फिरतात सर्व डोळ्यांनी पाहतात आणि पुन्हा संध्याकाळी आपापल्या घरी जातात ही वस्तुस्थिती आहे.


अहमदनगर शहरात कुठेही जा रस्त्यावर विविध ठिकाणी खाद्यपदार्थाच्या गाड्या त्या पुढे रस्त्यावर त्या ठिकाणी आलेल्या ग्राहकांच्या गाड्या आणि उरला तर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी रोड अशी परिस्थिती जुन्या नगर शहरापासून ते विकसित होत असलेल्या उपनगरांपर्यंत पाहायला मिळतात उदाहरण द्यायचं तर माळीवाडा, कापड बाजार , चितळे रोड, दिल्ली गेटगेट सावेडी मधील भिस्तबाग चौकापर्यंत अशीच परिस्थिती आहे केडगाव असेल किंवा बुरुडगाव रोड असेल या सर्व ठिकाणी हीच परिस्थिती आहे. मोठमोठ्या बिल्डिंग उभा आहेत त्या ठिकाणी असलेली दुकाने बाजूला राहतात आणि दुकानासमोर दहा वीस फूट बाहेर येऊन दुकानदार आपले दुकान थाटून उभा राहतात आणि त्यानंतर पार्किंग आणि त्यानंतर रस्ता अशी परिस्थिती सर्वच ठिकाणी आहे. तर रस्त्यावर गाडी लावणारे दुकानदार तर सातबारा उतारा आपल्या नावावर असल्यासारखे वागत असतात नगर शहरातील चितळे रोड, चौपटी कारंजा दिल्ली गेट या ठिकाणी दुचाकी घेऊन चालणेही मुश्किल होऊन जाते हीच परिस्थिती प्रोफेसर कॉलनी चौकात संध्याकाळी पाहायला मिळते तर प्रेमदान चौकातील एक एक पानवाल्यासमोर भर चौकात रोडवर गाडी लावून नागरिक पान खायला जातात आणि त्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होती मात्र ना पानवाल्याला याचा पस्तावा न गाडी पार्किंग करून करून जाणाऱ्याला याचा काही घेणे देणे नसते जर कोणी या ठिकाणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला चार शिव्या खाऊनच पुढे जावे लागते ही परिस्थिती रोजच अनुभवायला येते अशीच परिस्थिती प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यापारी संकुल समोर आहे गाळे आत मध्ये आणि गाळेधारकांच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या रस्त्यावर आणि त्याच्यापुढे पार्किंग त्यामुळे या ठिकाणी रोजच वाद किंवा अपघात होत असतात.

माळीवाडा कापड बाजार, चितळे रोड ,तेली खुंट, लाल टाकी चौक, सिद्धार्थ नगर, सर्जेपुरा, राज चेंबर, कोठला स्टॅन्ड एकविरा चौक,भिस्तबाग चौक याचप्रमाणे बुरुडगाव रोडवरील असे अनेक चौक आहेत की ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी नेत्याची आहे मात्र याबाबत महानगरपालिका अतिक्रमण विभाग कधीच कारवाई करताना दिसत नाही कुणी बडा नेता अथवा मोर्चा आंदोलन असले तरच या ठिकाणच्या परिसरात अतिक्रमण विभाग घेऊन अतिक्रमण केलेल्या लोकांना विनंती करतात आणि अतिक्रमण काढायला लावतात मात्र काही तासानंतर पुन्हा हे अतिक्रमण जैसे थे असते त्यामुळे शोषित नगरकर कसाबसा रस्ता शोधत आपले मार्गक्रमण करत असतात. महानगरपालिकेला संपूर्ण कर भरून फक्त वीज, पाणी ,रस्ते नाही तर शहरातील अतिक्रमण दूर करून मार्गक्रमण करण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी ही हा कर भरला जातो मात्र महानगरपालिके अतिक्रमण विभाग आणि प्रशासनाला याचा विसर पडला आहे. नगर शहरातील नागरिकांच्या कररुपी पैशातूनच महानगरपालिका आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार करतात मग त्यांचं कर्तव्य नाही का?

शहरातील अनेक मोठ मोठ्या दवाखान्या समोर अतिक्रमण करून फळे,चहा,नाश्ता यांच्या टपऱ्या असतात मात्र त्याठिकाणी असलेल्या स्थानिक नेत्याच्या आशीर्वादाने हे अतिक्रमण उभे असते जर कोणी दवाखान्याने याला विरोध केला तर डॉक्टरला वेळप्रसंगी सुनवले जाते तर अतिक्रमणधारक स्वतःचा हक्काची जागा असल्याप्रमाणे वागतात ॲम्बुलन्स जाण्यासाठी काही वेळा रोड नसतो अशी परिस्थिती शहरात आहे.

शहरातील अतिक्रमण दूर करणे तर या प्रश्नाचे उत्तरही मजेशीर असते राजकीय दबाव… जो तो स्थानिक राजकारणी आपले महानगरपालिकेचे गणित डोळ्यासमोर ठेवून अशा अतिक्रमणांना बळ देत असतो. एकीकडे अतिक्रमण काढा म्हणून सांगत असताना दुसरीकडे हळूच फोन करून अतिक्रमण विभागाला अतिक्रमण काढू नका अन्यथा पाहून घेऊ असा दमही दिला जातो त्यामुळे खरे दोषी हे महानगरपालिकेचे बेरीज डोळा समोर ठेवून नगरसेवक पदाची स्वप्न पाहणारे आणि स्वतःला नेते म्हणून घेणारे राजकारणी असून या राजकारण्यांमुळेच नगर शहराचा वाटोळ होत चालले आहे. त्यामुळे शहर विद्रूप होत चालले आहे तर रस्तेही या अतिक्रमामुळे गायब होत चालले आहेत त्यामुळे आता सोशिक नागरिकांनी याविरुद्ध आवाज उठवणे गरजेचे आहे अन्यथा काही दिवसांनी आपल्याला नगर शहरात पायवाट शोधत जावी लागेल अशीच परिस्थिती नगर शहरात होऊ शकते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular