Homeक्राईमलहान मुलाला मारण्याची धमकी देत तन्वीर शेख याने महिले कडून उकळले पैसे...

लहान मुलाला मारण्याची धमकी देत तन्वीर शेख याने महिले कडून उकळले पैसे आणि दागिने… आधी तन्वीर आणि मग सोहेल आणि अल्फेज यांनीही महिलेचा केला छळ..

advertisement

अहिल्यानगर दिनांक 17 मार्च

नगर मनमाड रोडवर असलेल्या देहरे गावातील एका महिलेला मुलाला मारण्याची धमकी देऊन पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या इसमांची इंस्टाग्राम वर त्या महिलेशी ओळख झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तनविर शेख, सोहेल शेख व अल्फेज शेख, अशी आरोपींची नावे असून. या सर्वांनी महिलेचा छळ करून अत्याचार केल्याची घटनाही समोर आली आहे.

त्या महिलेची आणि आरोपी तनवीर शेख यांची
इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यांनतर तन्वीर शेख हा नेहमी त्या महिलेस मेसेज करत होता. मात्र त्यासोबत बोलताना गावातील व्यक्ती म्हणून महिला बोलत होती. मात्र हे प्रकरण वाढत जाऊन तन्वीर शेख या नराधमाने त्या महिलेला वारंवार मेसेज आणि कॉल करण्यात सुरुवात केली. हे पाहून महिलेने तन्वीर शेख यास यापुढे मला मेसेज आणि कॉल करू नको असे सांगितले. याचा राग आल्यानंतर तनवीर शेख याने त्या महिलेस धमकी देण्यास सुरुवात केली जर माझ्यासोबत बोलली नाहीस तर मी आपले मेसेज आणि फोन कॉल तुझ्या नवऱ्यासह कुटुंबातील सर्व व्यक्तींना दाखवून तुझी बदनामी करेल आणि जरी तू बोलली नाहीस तर तुझ्या लहान मुलाला मारून टाकेल अशी धमकी देण्यास सुरुवात केली.

14 मार्च रोजी तन्वीर शेख याने त्या महिलेस फोन कॉल करून धमकी देत दहा हजार रुपये व घरातील सोन्याचे दागिने घेऊन गावातील बस स्टँड वर ये अन्यथा तुझ्या मुलाला मी मारून टाकेल अशी धमकी दिली तसेच गावात तुझी बदनामी करेल असेही सांगितल्यामुळे घाबरलेल्या महिलेने घरातील काही सोन्याच्या वस्तू आणि पैसे घेऊन बस स्टॅन्ड गाठले. आणि पैसे आणि सोने तन्वीर शेख याच्या हातात सोपवून ती महिला पुन्हा घराकडे जायला निघाली असताना बस स्टॅन्ड वर त्याच गावातील सोहेल शेख आणि अल्फेज शेख हे दोघे दबा धरून बसले होते. महिला घरी एकटी जाताना पाहून त्यांनी सांगितले आम्हीही गावात चाललो आहे तुम्हाला आमच्या गाडीत गावात सोडवतो असे म्हणत त्या दोघांनी महिलेला गाडीत बसवले अंधार पडल्या असल्याने महिलाही गाडीत बसून गावाकडे जाण्यास निघाली असताना तन्वीर शेख, सोहेल शेख व अल्पेश शेख यांनी गाडी दुसऱ्याच मार्गाकडे वळवली हे पाहून महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्या महिलेचे तोंड दाबून ओरडली तर तुझ्या मुलाला ठार मारू अशी धमकी त्या तिघांनी त्या महिलेला देण्यास सुरुवात केली. तसेच महिलेच्या ताब्यातील मोबाईल बळजबरीने काढून घेत सिम कार्ड काढून फेकून दिले.

तीन नराधमांनी त्या महिलेस गाडीत टाकून संगमनेर अकोले भंडारदरा परिसरात फिरवले. नंतर या तिन्हीही नराधमांनी त्या महिले जवळ असलेले पैसे दागिने घेऊन पोबारा केला. घाबरलेल्या महिलेने अखेर आपल्या घरच्यांशी संपर्क करून घडलेली हकीगत सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular