Homeशहरपत्रकार चौक डीएसपी चौक दरम्यानचे रोडचे काँक्रिटीकरण कामाचा लवकरच शुभारंभ वाहतुकीसाठी रस्ता...

पत्रकार चौक डीएसपी चौक दरम्यानचे रोडचे काँक्रिटीकरण कामाचा लवकरच शुभारंभ वाहतुकीसाठी रस्ता काही काळासाठी राहणार बंद.. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने रस्ता झाला मंजूर….

advertisement

अहमदनगर दि.२६ जून
अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते पोलीस अधीक्षक ऑफिस म्हणजे डीएसपी चौक या दरम्यानचे रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचे काम सुरू होणार आहे. यासाठी हा रस्ता काही दिवस बंद राहणार असून या रस्त्यावरून होणारी वाहतूक पत्रकार चौक, दिल्लीगेट, मार्गे नेप्ती चौक, आयुर्वेदिक चौक, नवीन आणि जुना टिळक रोड मार्गे बाहेर काढण्यात आलेली आहे. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे जवळपास दोन ते तीन महिने हा रस्ता बंद राहणार आहे.

अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने हे काम मंजूर झाले असून या कामास आता सुरुवात होणार आहे. डीएसपी चौक ते पत्रकार चौक हा रस्ता अहमदनगर शहरातून जाणारा महामार्ग असून जुने शहर आणि नवीन उपनगरे यांना जोडणाराही हा रस्ता आहे. हा रस्ता अनेक दिवसांपासून मंजूर होता मात्र लोकसभेची आचारसंहिता असल्यामुळे या कामाला गती मिळाली नव्हती अखेर लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर आता या कामात सुरुवात होणार असून या कामामुळे अहमदनगर शहराच्या विकासात भर पडणार आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुरामुळे हा रस्त्याचे काम सुरू होणार असून नगर शहरातील अनेक रस्ते आता काँक्रिटीकरण होणार आहेत लवकरच या सर्व कामांची ही सुरुवात आता होणार असून जवळपास जुने नगर आणि नवीन उपनगरांमधील बहुतांश रस्ते हे काँक्रेटकरण असल्यामुळे नगर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular