अहिल्यानगर : दिनांक 6 जुलै
जागा मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून खरेदीचे प्रकार वारंवार घडत असून या सर्व प्रक्रियेला राजकीय वरदहस्त आणि महसूल विभाग दुय्यम निबंधक कार्यालय सुधा तितकेच जबाबदार आहेत. शहर वाढत असताना नवनवीन वसाहती उभा राहत आहेत.त्यामुळे सुरवातीला शहराच्या बाहेर असलेल्या जमिनी आता उपनगर म्हणून त्या ठिकाणी मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे त्यामुळे या जागांना सोन्यापेक्षाही जास्त भाव मिळत आहे.
काही नागरिकांनी शहराबाहेर जागा घेऊन ठेवल्या होत्या तील नागरिकाचा एक तर बाहेरगावी निघून गेले आहे किंवा त्यापैकी बरेच जणांचा मृत्यू झालेला आहे याचाच फायदा घेत काही राजकीय लोक गुंडांना हाताशी धरून अशा जागा शोधून त्या जागेच्या मूळ मालकाच्या जागेवर बनावट व्यक्ती उभा करून खरेदी करून त्या विक्री करण्याचा फंडा सध्या जोरात सुरू आहे.
महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयातून जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर खरेदी-विक्री करण्याचे गुन्हेगारी प्रकारही तितक्याच सर्रासपणे घडत आहेत. या दोन्ही विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर करण्याचे गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात तब्बल २७गुन्हे दाखल झाले आहेत.नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात त्यापैकी आठ गुन्हे दाखल आहेत.
डायाभाई नामक एका व्यक्तीची नगर मनमाड रोडवर एका मोक्याच्या ठिकाणी अशीच एक जमीन असून त्या जागेची खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्या जागेचे मूळ मालक सध्या परदेशात तर काही मुंबईत राहत आहेत. मात्र हिजाबनामा म्हणजेच बक्षीस पत्र दाखवून त्या जागेची खरेदी विक्री करण्यात आली आहे. या ठिकाणी आधी जनावरांच्या हाडाचा कारखाना होता. ती जागा आता मोक्याच्या ठिकाणी आली असून या ठिकाणचा सर्वच व्यवहार संशयस्पद आहे. विशेष म्हणजे नगरमध्ये आणि घोटाळ्यांमध्ये नाव असलेल्या एका व्यक्ती या घोटाळ्यात सामील असून अशाप्रकारे फसवणूक करून आणि खोट्या खरेदी करून जागा बळकवण्याचा त्याचा हातखंडा आहे. त्याने शहरातील काही राजकीय लोकांना हाताशी धरून ही जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.