अहिल्यानगर दिनांक 25 मे
रात्री ११ नंतर शहर होणार बंद; नवीन पोलीस अधीक्षक येताच नियम लागू झाला असला तरी हा नियम किती दिवस सुरू राहणार आणि या नियमयात फक्त छोटे मोठे व्यावसायिक टार्गेट न राहता मोठ्या हॉटेलवर सुद्धा कारवाई व्हावी अन्यथा हा नियम गरिबांच्या मुळावर उठणारा असेल.
जिल्हा पोलीस पोलिस अधीक्षक म्हणून सोमनाथ घार्गे यांनी पदभार घेताच शनिवारी रात्री शहरातील रात्री उशिरा चालणारे व्यवसाय रात्री अकरा म्हणजे अकरा वाजता पोलिसांनी बंद केले. मात्र या कारवाईत मोठे हॉटेल सुरूच होते त्यामुळे नियम सर्वांना सारखाच लागू होणे गरजेचे आहे.दूध विकणाऱ्याला नियम आणि दारू विकणाऱ्याला सूट असे झाले तर हा सर्वसामान्य व्यावसायिकांवर अन्याय असेल.
त्यामुळे नियमानुसार रात्री ११ वाजेनंतर शहर बंद झाले पाहिजे अशी भूमिका नवीन पोलिस अधीक्षकांनी घेतली असेल तर याचे स्वागत आहे.मात्र रात्री उघडणाऱ्या चौपाटी वरील पावभाजी दुध विक्री करणाऱ्या हातगाड्या थंड पेय आईस्क्रीम विकणाऱ्या गाड्या यांना टार्गेट न करता शहरातील सर्व छोट्या-मोठ्या हॉटेल्स दारू विक्री करणारे मोठे हॉटेल यांच्यावर कायद्याचा बडगा उगरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर एसटी स्टँड परिसरात बसणारे टोळके तसेच चौकाचौकांमध्ये बसणाऱ्या टोळक्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.