अहिल्यानगर दिनांक – 24 मे
देशातील परिवहन विभागाने सर्व वाहनाचे वाढविलेले चालान आणि रजिष्ट्रेशन चे वाढविलेले दर यामुळे अगोदरच वाहन धारक संतापले असताना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचारी अधिकारी आणि त्यांनी दलालाच्या माध्यमातून पसरविलेलल्या जाळ्यातुन जो भ्रष्टाचार फोफावला आहे आणि वाहन धारकांना शुल्लक चुकीमुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे ते पाहता प्रादेशिक परिवहन कार्यालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयात लावलेले सिसिटीवी फुटेज जर बाहेर आले तर या कार्यालयातील कार्यालयीन फाईल घेऊन फिरत असलेले दलाल व त्यांच्या माध्यमातून वाहन धारकांची होणारी लूट व त्या लुटीचा बोकाळलेला भ्रष्टाचार उघड पडू शकतो, पण मुळात हेच सिसिटीव्ही फुटेज देण्यास प्रादेशिक परिवहन अधिकारी टाळाटाळ करतात त्यामुळं इथे चाललेला भ्रष्टाचार उघड होतं नाही व कुणी पत्रकार किंव्हा राजकीय पदाधिकारी यांनी या मुद्द्याला हात घातला तर खंडणी मागताहेत ही खोटी सबब पुढे करून पोलीस स्टेशनं मध्ये तक्रारी दिल्या जाते पण भ्रष्टाचारी प्रादेशिक परिवहन अधिकारी व कर्मचारी मात्र गुन्हे करूनही मोकाट फिरतात आणि पुन्हा दुसरा गुन्हा करण्यासाठी मोकळे, अगदी हिचं पद्धत वर्षगणित या कार्यालयात सुरु आहें.
नगर शहरात अवजड वाहन मार्गस्थ करण्यासाठी जी अवैधरित्या फी आकारली जाते ती फी म्हणजेच कार्ड सिस्टीम होय.. यासाठी रात्रंदिवस कबाड कष्ट करून पैसे गोळा करून देणारे एजंट करोडपती झाले आहेत. नगर शहरातच नव्हे तर पुणे, मुंबई, नागपूर, यासारख्या ठिकाणी एजंटांची प्रॉपर्टी आहे. आता सध्या नगर शहरात रोमी,वल्लभ,लकी, शुभम, यांच्या सारखे एजंट असून हे सर्वजण अधिकाऱ्यांना पैसे गोळा करून देण्याचे काम करत असतात सर्वात जास्त गाड्या रोमी याच्या असून तो 15 ते 20 वर्षांपासून या व्यवसायात आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून मोठी माया त्याने जमा केली आहे. यांचा व्यवसाय पाहिला तर काहीच नाही मात्र यांच्याकडे आलिशान गाड्या महागडे मोबाईल येतात कुठून हा प्रश्न सर्वसामान्य एजंट लोकांना पडतात. आता अधिकाऱ्यांबरोबर बोलताना प्रत्येक जण ॲपल मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करतात त्यामुळे रेकॉर्डमध्ये कॉल हिस्ट्री सापडणार नाही याची परिपूर्ण दक्षता घेतली जाते. ही साखळी अत्यंत मोठी असून वरपासून खालपर्यंत साखळी आबाद राखण्याचं काम एजंट करत असतात. आता याची पोलखोल करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते थेट रोडवर उतरून अवजड वाहने पकडून ती आरटीओ मध्ये जमा करणार आहेत आणि याचे सोशल मीडियावरून लाईव्ह प्रक्षेपण करून ही साखळी कशी चालते याचा भांडाफोड लवकरच होणार आहे.