अहिल्यानगर दिनांक २० मे
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणात खा.निलेश लंके यांनीही प्रतिक्रिया दिली असून “माजी महापौराविरुद्ध दाखल गुन्ह्याबाबत वेगळं चित्र उभं केलं जात आहे. ज्याने काही गुन्हा दाखल केला आहे, तो काही काळ माजी आमदार दादा कळमकर यांच्याकडे काम करत होता. चालक असताना, त्याने त्याचा वापर करून नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून पैसे घेतले. हा प्रकार उघडकीस आल्यावर, त्याला जाब विचारला. त्याला सांगितले की, तू ज्या लोकांकडून पैसे घेतले आहे, ते परत कर, त्याला कठोर शब्दात समज दिली, यावर अपहरण झाले असे म्हणता येणार नाही”. अशी प्रतिक्रिया खा. निलेश लंके यांनी दिली आहे.
तर आता या प्रकरणातील फिर्यादीला जीवाची भीती लागली असून माजी महापौर अभिषेक कळमकर आणि त्यांच्या साथीदारांकडून आपल्या कुटुंबाला धोका असून खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात अशी भीती फिर्यादी रविंद्र रामराव शेळके यांनी व्यक्त केली आहे. तसेच जर मी पैसे घेतले होते असे सांगण्यात येत आहे तर मग दोन वर्ष माझ्यावर गुन्हे दाखल का झाले नाहीत त्यामुळे हे सर्व आरोप खोटे असून मला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी रवींद्र शेळके यांनी केली आहे.
रयत शिक्षण संस्थेमध्ये अभिषेक कळमकर आणि त्यांच्या पत्नीने नोकरीला लावुन देतो असे सांगून बऱ्याच लोकांकडुन पैसे गोळा केले होते. त्याबाबत सर्व हकीकत मला महिती होती. त्यांचे सर्व व्यवहार हे माझ्या समक्ष झाले होते. त्यानंतर जेव्हा मला असे समजले की, अभिषेक कळमकर हे लोकांची फसवणूक करुन पैसे गोळा करीत आहेत. ते लोकांना कोणत्याही नोकरीला लावणार नसून अभिषेक कळमकर यांना दिलेल्या पैशाचा इतरत्र वापर करत आहे असे मला दिसले तेव्हा मी त्यांना बोलो होतो की, साहेब आपण हे चुकीच करत आहात आपण हे केले नाही पाहिजे लोकांची फसवणूक नाही केली पाहिजे परंतु त्यांनी मला धमकी दिली की, तू काय इतका मोठ्या लायकीचा नाही की तू मला ज्ञान शिकवतो आणि जर ही गोष्ट बाहेर बोललास तर अश्या गुन्ह्यात अडकवेल की आयुष्यभर जेल मधून बाहेर येणार नाही, त्यामुळे मी घाबरून कुठेही ही गोष्ट सांगितली नाही. परंतू मी इथे नोकरी करणे योग्य वाटत नसल्याने मी नोकरीही सोडून दिली होती. तेव्हा पण माझे व अभिषेक कळमकर याचे वाद झाले होते. आणि त्यापासून मी नोकरी सोडून दिली होती मात्र त्यानंतर हे मला त्यांच्याकडून अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवलेली असून कळमकर यांच्यापासून माझ्या कुटुंबियांना धोका असल्यामुळे पोलिसांनी माझे संरक्षण करावे अशी मागणी शेळके यांनी केली आहे.