अहिल्यानगर दिनांक 19 मे
माजी महापौर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर अपहरण करून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.रवींद्र रामराव शेळके यांच्या फिर्यादीवरून नगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मच्छिंद्र झेंडे, अभिषेक कळमकर, लालू उर्फ अभिषेक जगताप, तसेच एक महिलेसह अनोळखी पाच इसमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील आर्थिक कारण आणि कळमकर यांनी केलेले रयत शिक्षण संस्थेतील आर्थिक घोटाळे माहीत असल्याच्या कारणावरून ते कोणाला सांगू नये म्हणून अपहरण करून करून रवींद्र रामराव शेळके यांना मारहाण करून त्यांच्याकडून विविध स्टॅम्पवर बळजबरी सह्या घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.रवींद्र रामराव शेळके हा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे दहा वर्षापासून चालक म्हणून कामाला होता.मात्र रयत शिक्षण संस्थेमधील काही आर्थिक घोटाळे माहीत झाल्याने रवींद्र रामराव शेळके याने दोन वर्षापासून चालक म्हणून असलेली नोकरी सोडून दिली होती. सहा महिन्यापूर्वी सुद्धा रवींद्र रामराव शेळके यांच्या अंगाराव गाडी घालून मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप शेळके यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी नगरतालुका पोलिस ठाण्यात तक्रारा केलेली असल्याचे सांगितलेय.
12 मे रोजी रवींद्र रामराव शेळके यांचे नगर सोलापूर रोडवरून पांढऱ्या व रंगाच्या टोयाटो कंपनीच्या वाहनातून आलेल्या लोकांनी अपहरण करून त्यांना चिखली या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली तसेच एका महिले बरोबर बळजबरीने फोटो काढून घेण्यात आले आणि त्यानंतर काही नोटरी आणि कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेतल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या पासून आपल्याला आणि कुटुंबाला धोका असल्याने शेळके यांनी केली संरक्षणाची मागणी केली आहे.