अहिल्यानगर दिनांक -१९ मे
माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर भिंगार पोलिस ठाण्यात अपहरण करून खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांचे काका आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यावरही तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट रामराव शेळके यांनी ही तक्रार दाखल केली असून 14 मे रोजी पोपट शेळके यांना फोन करून दादाभाऊ कळमकर यांच्या भुतकरवाडी येथील घरी बोलवण्यात आले होते. त्या ठिकाणी शेळके हे गेले असता अभिषेक कळमकर, दादाभाऊ कळमकर आणि मच्छिंद्र झेंडे या तिघांनी तू आणि तुझा भाऊ रवींद्र शेळके याने आमचे नुकसान केले आहे त्याचे पैसे दे नाहीतर तुझी शेतजमीन विक व माझी भरपाई करून दे म्हणून तिघांनी शिवीगाळ करून दहशत करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम 352 350(3)(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.