Homeक्राईमराज ने अंधाराचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला मात्र अल्पवयीन मुलगी च्या ओरडण्याने...

राज ने अंधाराचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला मात्र अल्पवयीन मुलगी च्या ओरडण्याने सर्व डाव फसला… जाब विचारणाऱ्या अल्पवयीन मुलीस हसन शेख यांनी मारले दगड… अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी..

advertisement

अहमदनगर दि.१९ ऑगस्ट
अहमदनगर तालुक्यातील जखणगाव येथील एक धक्कादायक घटना समोर आली असून एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या तरुणाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुलीला जबर मारहाण करून तिचे डोके फोडण्याची घटना घडली आहे. याबाबत पहाटे उशिरा नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये सहा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हकीकत अशी की एक अल्पवयीन मुलगी रात्री घरासमोर असलेली बोअरची मोटर बंद करण्यासाठी घराबाहेर आली होती त्याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन त्या परिसरात राहणारा राज हसन शेख याने त्या अल्पवयीन मुलीला बाजूला अंधारात ओढत नेण्याचा प्रयत्न केला मात्र तिने आरडा ओरड केल्याने त्याच वेळी मोटार बंद का झाली नाही म्हणून पाहण्यासाठी आलेले त्या मुलीचे वडील यांनी आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि ते आवाजाच्या दिशेने धावले. त्यामुळे ते पाहून आरोपीने मुलीला सोडून पळ काढला अंधार असल्यामुळे तो मुलगा कोण आहे हे अल्पवयीन मुलीच्या वडिलांना समजले नाही मात्र अल्पवयीन मुलीने त्याचा चेहरा पाहिला असल्याने तिने सांगितले की आपल्या गावातीलच हसन शेख यांचा मुलगा असून त्यानेच माझा हात पकडला होता आणि अंधारात ओढत नेत होता. तिने त्याबाबत आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर त्या अल्पवयीन मुलीचे वडील हसन शेख यांच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले होते मात्र हसन शेख यांनी सांगितले की मी माझ्या मुलांना घेऊन तुझ्या घरासमोर येतो आणि तुझ्या मुलीला विचारतो की नेमका अंधारामध्ये कोण होतं त्यानंतर हसन शेख हा आपल्या कुटुंबासह त्या अल्पवयीन मुलीच्या घरात जवळ जाऊन त्या अल्पवयीन मुलीस विचारले की कोण होते तिने हसन शेख यांच्या मुलाकडे राज शेख यांच्याकडे बोट दाखवून हाच अंधारात आला असल्याचं सांगितलं.

त्यावेळी हसन शेख, त्याची बायको व दोन मुले -राज आणि त्याचा भाऊ हसन शेख याची बायको हसन शेख याचा भाचा रिजवान शेख, रिजवान शेख याची आई अशांनी शिवीगाळ करून अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयास मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यावेळी हसन शेख याने दगड मारला तो अल्पवयीन मुलीच्या डोळ्याच्या खाली लागल्याने ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी त्या मुलीस घेऊन उपचारासाठी थेट जिल्हा रुग्णालय गाठले.

अल्पवयीन मुलीस उपचार सुरू केल्यानंतर तिच्या कुटुंबातील काही व्यक्तींनी नगर तालुका पोलीस स्टेशनला जाऊन ही माहिती देऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केली मात्र जिल्हा रुग्णालयातूनच आपला गुन्हा दाखल होईल असे नगर तालुका पोलीस स्टेशनच्या त्यावेळी असलेल्या अधिकारी आणि पोलिसांनी सांगितले त्यानंतर अल्पवयीन मुलीचे कुटुंब पुन्हा जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर तिथे असलेल्या पोलिसांनी तुम्हाला नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये जाऊनच गुन्हा दाखल करावा लागेल असे सांगितले त्यामुळे त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना नाहक हेलपाटे मारायला लागले यामुळे नगर तालुका पोलिसांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.

अखेर त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी नुसार हसन शेख, त्याची पत्नी , राज हसन शेख, हसन शेख याचा दुसरा मुलगा नाव माहित नाही. रिजवान शेख,रिजवान शेख याची आई यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023
189(2) भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023
191(2) भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023
118 (1) भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023
115 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023
125 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023
352 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023
74 भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023
75 बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ मुंबई पोलीस अधिनियम, १९५१
37(1) मुंबई पोलीस अधिनियम, १९५१
37(3) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार असून नगर तालुका पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular