अहमदनगर -राज्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत समाविष्ट करून घ्यावे म्हणून मंगल भुजबळ यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्ष्यापासून संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांनी वेळोवेळी सरकारविरोधात आंदोलन करून,सरकारला निवेदन देऊन कंत्राटी कर्मचारी यांना कायम सेवेत करण्याची मागणी करत होते त्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात 2018 ला कलेक्टर ऑफिस समोर मंगल भुजबळ यांनी मोठे आंदोलन उभारले होते तसेच त्यानंतर राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली होती.प्रत्येक वर्षी मुंबई येथे संघटनेचे अधिवेशन घेऊन संघटनेला दिशा देण्याचे काम त्या करत होत्या.
गेल्यावर्षी 2 व 3 ऑक्टोबर 2022 व 2023 रोजी मुंबई येथे आजाद मैदान मध्ये मोठया प्रमाणात संघटनेच्या बंधू व महिला भगिनींना सोबत घेऊन बेमुदत उपोषण आंदोलन करून सरकारला त्यांनी ईशारा दिला होता तेव्हा सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून आंदोलन स्थागित केले होते त्यानंतर भुजबळ यांनी आरोग्याचे आयुक्त व आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांना सातत्याने भेटून त्या फाईलचा पाठपुरावा करत होत्या अखेर त्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने ज्या कंत्राटी कर्मचारी यांना 10 वर्ष सेवेत पूर्ण आहेत त्यांना शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याचा GR काढून त्या कर्मचारी यांची सेवा जेष्ठता यादी तयार केली असून त्यांना रिक्त पदावर शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे त्यामुळे भुजबळ यांच्या लढयाला मोठे यश मिळाले असल्याने शासकीय सेवेतील कंत्राटी कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे…