बीड दि.२८ जानेवारी
तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा
मावेजा देण्यासाठी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी १० हजार रूपयांची लाच मागितली. ही लाच एका निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरूवारी दुपारी तीन वाजता भूसंपादन विभागाच्या कार्यालयात केली.
बीड जिल्ह्यातील एका गावातील तक्रारदाराच्या
आईच्या नावे असलेली जमीन व घर हे
गावातीलच तलावात गेले होते. त्याचा ५ लाख
३८ हजार ९६५ रूपये एवढा मावेजा मिळावा,
यासाठी भूसंपादन विभागाकडे अर्ज केला होता.
परंतू उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी हा अर्ज निकाली काढण्यास टाळाटाळ केली. शिवाय १० हजार रूपयांची लाचही मागितली. यावर पाच दिवसांपूर्वी संबंधिताने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात एसीबीने गुरूवारी दुपारी भूसंपदा कार्यालयात सापळा लावला होता वसुलीसाठी नेमलेला सेवानिवृत्त मंडळाधिकारी सरोदे याला दहा हजार रुपयांचे लाच घेताना पकडण्यात आले आहे आता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.