अहमदनगर दिनांक १९ जून
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता विधानसभेचे वारे वाहू लागले असून लोकसभेच्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काट्याची टक्कर झालेल्या मुकाबल्यात महाविकास आघाडीने विजय मिळवला आणि हा विजय आपल्यामुळेच कसा मिळाला याचे गणित आता इच्छुक उमेदवार बोलून दाखवू लागले आहेत. त्यामुळे विधानसभेला महाविकास आघाडी कडून सध्यातरी डझनभर इच्छुक असल्याचे समोर आले आहे.
मात्र त्या सर्व ज्या खऱ्या कार्यकर्त्यांनी विजयामध्ये खारीचा वाटा उचलला आहे त्या कार्यकर्त्यांना विचारायलाच कोणी तयार नाही सर्व नेते आपणच कसे सरस आहोत याच्या सुरस कहाण्या सांगत सुटले आहेत त्यामुळे आता एकमेकांविरोधातच त्याने कसे काम केले नाही अशी चर्चा सुरू आहे.
अहमदनगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून तत्कालीन खासदार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून उभे होते. अनेक प्रकरणे त्यांनी बाहेर काढून त्याचा पाठपुरावा सुरू केला होता. ते थेट निवडणुकीच्या अर्ज भरण्यापासून ते निवडणुकीच्या मतमोजणी पर्यंत गिरीश जाधव हे खऱ्या अर्थाने विखे आणि महायुतीच्या विरोधात उभे होते.
गिरीश जाधव यांनी लोकसभेचा अर्ज भरल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र हा अर्ज खास करून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेप घेण्यासाठी अर्ज भरला होता. आणि त्याप्रमाणे त्यांनी हरकतीच्या दिवशी ते दाखवूनही दिले होते निवडणूक प्रशासन गिरीश जाधव यांच्यापुढे अक्षरश हतबल झाल्याचं चित्र दिसून आले होते अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गिरीश जाधव यांनी अर्ज मागे घेऊन पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून निवडणुकीत काम करून निलेश लंके विजयापर्यंत नेले मात्र त्यांनी केलेले खरे काम कधीच समोर आले नाही. कागदपत्रे असेल किंवा कोर्ट काचेरीचे काम असेल याबाबत गिरीश जाधव यांनी महायुतीच्या उमेदवाराला हैराण करून सोडले होतेआणि निलेश लंके यांना अखेर पर्यंत विजया पर्यंत नेण्याचे कामही गिरीश जाधव यांनी केले होते.
लोकसभा निवडणूक झाली त्यामुळे आता गिरीश जाधव यांनी केलेल्या तळमळीने आणि चिकाटीने केलेल्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा गिरीश जाधव यांच्या कार्यकर्त्यांची असून गिरीश जाधव हे एकटेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्य पुढे नेत असल्याचा वेळोवेळी दिसून येत आहे. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण या पक्षाच्या धेयधोरणा नुसार उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव हे काम करत असून गेल्या वर्षभरात प्रत्येक सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांवर बोलण्याचं काम गिरीश जाधव यांनी केले आहे.
घनकचरा घोटाळा, पाणीपट्टी घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश गिरीश जाधव यांनी केला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे राहून सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी अनेक कामे केली आहेत मात्र ते कधीही मीडियासमोर गेले नाहीत त्यामुळे त्यांचे काम जनतेसमोर असल्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने तिकीट देऊन त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळावी अशीच भावना आता गिरीश जाधव यांचे कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.
सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून डॅशिंग नेतृत्व म्हणून आणि रात्री अपरात्री जनतेच्या कामासाठी धावून जाणारा नेता म्हणून गिरीश जाधव यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे त्यांच्या कामाचा धडाका पाहून या निवडणुकीत निश्चितपणे त्यांच्या बाजूने निर्णय होईल अशी अपेक्षा ही आता गिरीश जाधव यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.