दिल्ली दिनांक 16 ऑगस्ट
निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जम्मू कश्मीर ,हरियाणा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या विधानसभा जाहीर होणार का याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने याबाबत प्रेस रिलीज केली असून आज दुपारी ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून निवडणूक आयोगाचा नेमक्या कोणत्या राज्यांच्या निवडणुका घोषित करणार याकडेच आता दुपारपर्यंत सर्वांचे लक्ष लागणार आहे.