अहिल्यानगर दिनांक 22 मे
नगर शहरात परिवहन विभागातील काही एजंट कडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत रोज नवनवीन किस्से समोर येत असून. याबाबत परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसून येत नाही. काही लोक पैशाच्या लालसेने एवढे अंध झालेले आहेत की पैसा कसा येईल आणि आपल्या खिशात कसा जाईल याकडेच त्यांची नजर असते. मग तो पैसा गोर गरीब सर्वसामान्य कष्टकरी जनतेकडून लुबाडलेला का असेना.
मध्यंतरी राज्यातील सत्ताधारी पक्षाचा एक नेता परिवहन विभागातील माटे साहेबांच्या चांगलाच मागे लागला होता. त्या नेत्याने माटे साहेबांचे सर्व कारणामे भ्रष्टाचार कागदपत्रांसहित बाहेर काढले होते. मात्र अखेर हे कारनामे झाकण्यासाठी नगर शहरातील एक आलिशान हॉटेलमध्ये बैठक होऊन त्या गोष्टीवर पडदा टाकण्यात आला असला तरी आता हे प्रकरण पुन्हा बाहेर येण्याची शक्यता आहे. कारण नगर शहरातून होणारा पैशातील काही भाग त्या साहेबांकडे अजूनही पोहोच होत आहे.
तर नगर शहरातील उबेद सध्या चांगलाच जोरात असून त्याच्या आदेशाशिवाय री पासिंग होणारे वाहनांचे कागदपत्र हलतच नाही. जोपर्यंत उबेद याला मोठ्या वाहनामागे पाच आणि छोट्या वाहनामागे साडेतीन हजार रुपयांचे लक्ष्मी दर्शन होत नाही तोपर्यंत या गाड्यांचे कागदपत्र टेबलावरून (ऑनलाइन असल्याने कॉम्प्युटर वरून पुढे जात नाही)पुढे सरकत नाही. तर गोरगरीब पिकअप व्हॅन छोट्या मालवाहतूक गाड्यांना पंचवीस ते तीस हजार रुपये दंड आकारून गोरगरीब जनतेला त्रास देण्याचे काम सध्या सुरू आहे.
त्याचबरोबर ओव्हरलोड वाहने शहरातून जाण्यासाठी जी कार्ड सिस्टीम चालू आहे. त्यामध्ये सुद्धा काही कार्डधारकांना कमी रेट तर काही कार्डधारकांना जास्तीचे रेट लावण्यात येत आहेत यावरूनही सध्या चांगलीच कुरबुर सुरू आहे. त्यामुळे सर्व पैसा जर उबेद मार्फत वरपर्यंत जात असेल. तर खालच्यांनी फक्त हमाली करायची का असा सवाल आता काही लक्ष्मी दर्शन देणारे कार्डधारक एजंट बोलून दाखवत आहेत.
जर सर्व भ्रष्टाचार समोर आणायचा असेल तर या लक्ष्मी दर्शन देणारे एजंट आणि अधिकाऱ्यांचे फोनचे कॉल रेकॉर्ड बाहेर काढले तर मोठी साखळी समोर येऊ शकते.