अहमदनगर दिनांक २ नोव्हेंबर
अहमदनगर शहरात गेल्या महिन्यात सिताराम सारडा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला होता जेव्हा या हल्ल्याचं कारण समोर आले तेव्हा सर्वांना चांगलाच धक्का बसला होता. हेरंब कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या सिगरेट पान आणि गुटखा तंबाखू विक्री असलेल्या दुकाने काढून टाकण्यासाठी महानगरपालिकेला तक्रार अर्ज दिल्यानंतर महापालिकेने या टपऱ्यांवर कारवाई केल्यामुळे हा हल्ला झाल्याचं समोर आले होते. त्यानंतर अहमदनगर शहरात पुन्हा एकदा अवैद्य धंदे आणि अवैद्य गुटका सुगंधी सुपारी मावा विक्री यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पोलिसांनी त्या काळात काही ठिकाणी छापे टाकून गुटखा आणि बंदी असलेली सुगंधी सुपारी पान मसाले जप्त केले होते. मात्र पुन्हा आता या अवैद्य गुटका चालक तसेच सुगंधी सुपारी आणि मावा विक्रेत्यांनी डोके वर काढले असून पुन्हा खुले आम विक्री शहरात ठीक ठिकाणी सुरू झाली आहे.
शाळा,कॉलेज, एसटी स्टँड ,पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या घराच्या आसपास हे अवैद्य मावा गुटखा सुगंधी सुपारी विक्री सुरू असून अहमदनगर शहरात असलेले अन्न औषध कार्यालय हे नेहमीप्रमाणे झोपलेले आहे. हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला होऊनही हे कार्यालय अजून जागे झालेले नाही. अन्न औषध प्रशासनाला गुटखा मावा सुगंधी सुपारी आदींवर कारवाई करण्याची थेट परवानगी असते. पोलिसांनी छापा टाकला तरी अन्न औषध प्रशासनाचा अधिकारी आल्याशिवाय तक्रार दाखल होत नाही त्यामुळे पोलीस या झंझटित पडत नाही. तर अन्न औषध प्रशासन नाटकी झोपेत असल्यामुळे हे अवैद्य गुटखा विक्री केंद्र पुन्हा एकदा सुरू झाले आहेत मात्र हेरंब कुलकर्णी यांच्यासारखी पुन्हा एखादी मोठी घटना घडली तरच प्रशासन जागे होईल का ? असा प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.