अहमदनगर दिनांक 11 जुलै
तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वैदुवाडी येथे एका घराच्या आडोशाला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये काळू मारुती शिंदे हा बेकायदेशीर रित्या शासनाचा कोणताही परवाना नसतांना एच.पी व भारत गॅस कंपनीच्या डोमेस्टीक व कमर्शीअल गॅस टाक्या जवळ बाळगून लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टाकीतुन गॅस काढुन तो एल.पी.जी ऑटोरिक्षामध्ये अनधिकृत रित्या रिफिलींग करीत आहे, ही माहिती कळताच आनंद कोकरे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतर गुन्हे शोध पथकाने माहिती प्रमाणे खात्री करून, काळु शिंदे याच्या राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला, वैदुवाडी येथे छापा टाकुन काळू मारुती शिंदे याच्या ताब्यात असलेल्या 4,16,200/- रुपये किंमतीच्या एकुण 53 गॅस टाक्या, तीन इलेक्ट्रिक मोटर त्यास गॅस रिप्लींग करीता लावलेले मशिन, त्यास दोन पाईप त्याचे तोंडाला नोझल जोडलेले असा मुद्देमाल जप्त करण्यात आला याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनचे पो.कॉ.सतिष साहेबराव त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर गु.र.नं 783/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 287, 288, 125 सह जिवनावश्यक वस्तु कायदा 1995 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.हे.कॉ.प्रदिप बडे हे करत आहेत.
सदरची कारवाई.पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा.अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी,.अमोल भारती यांचे सुचना मार्गदर्शनाखालील पो.नि.आनंद कोकरे यांच्या पथकातील पो.उप निरी.श्री.शैलेश पाटील, पोहेका.दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, दिनेश मोरे, वसिम पठाण, भानुदास खेडकर, अहमद इनामदार, सुधीर खाडे, पोना संदिप धामणे, सुरज वाबळे, पोकॉ सतीष त्रिभुवन, सतीष भवर, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सुमीत गवळी, बाळासाहेब भापसे यांनी केली आहे.