Homeक्राईमअंड नको म्हणून त्यांनी कोंबडीच कापली.... आणि तेथेच तो फसला....सिराज खानने गोळीबाराचा...

अंड नको म्हणून त्यांनी कोंबडीच कापली…. आणि तेथेच तो फसला….सिराज खानने गोळीबाराचा प्लॅन केला पण त्याच्यात अंगलट आला…. मात्र डॉक्टर यातून बालंबाल बचावले…

advertisement

अहमदनगर दिनांक 11 जुलै
अहमदनगर शहरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याच्या उद्देशाने सिराज खान या आरोपीने गोळीबार करण्याचे नाटक करून यामध्ये डॉक्टरला गोवण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांच्या सतर्केमुळे हा डाव हाणून पाडण्यात आला असून गुंड असलेला आरोपी सिराज खान याच्याच अंगलट स्वतःचा डाव उलटला आहे.

अहमदनगर शहरातील डॉक्टर प्रदीप कुमार तुपेरे आणि या प्रकरणातील आरोपी सिराज खान आणि फिर्यादी राजेंद्र बहुधने यांच्यावर काही वर्षांपूर्वी डॉक्टर प्रदीप तुपेरे यांचे दवाखान्याच्या बाहेर असलेल्या अतिक्रमण काढण्यावरून सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता हा गुन्हा डॉक्टर मुळे आपल्यावर झाला असल्याचा बनाव करत आरोपी सिराज खान हा डॉक्टर तुपेरे यांना ब्लॅकमेल करत होता तर आता पुन्हा डॉक्टरला भीती दाखवून अजून पैसे उकळण्याचा डाव सिराज खान याने आखला आणि त्याने प्लॅन करून डॉक्टरसह राजेंद्र बहुधने यांना स्वतःच्या मालकीच्या मशिरा फिश & बर्ड हाऊस येथे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी राजेंद्र बहुधने यास मारहाण करून सिराज खान याने स्वतःचा मुलगा मोहीम खान यांच्याकडून बंदूक मागवून राजेंद्र बहुधने याच्यावर गोळी झाडण्याचे नाटक करत ही गोळी जमिनीवर फायर केली. आणि पुन्हा ती बंदूक राजेंद्र बहुधने याच्या हातात देऊन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर प्रदीप तुपेरे यांना दम देऊन सांगितले की पोलिस आल्यावर सांगायचे की या राजेंद्र बहुधनेने माझ्यावर गोळीबार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला मी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्यामुळे माझ्या नादी लागू नका असे म्हणून पोलिसांना फोन करण्यास सांगितले होते. ही घटना घडल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या सर्व व्यक्तींना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गाठले पोलीस ठाण्यात आल्यानंतर डॉक्टर प्रदीप तुपेरे यांनी सांगितलेल्या घटनेनुसार पोलिसांनी जबाब देण्यास सुरुवात केली होती मात्र डॉक्टर प्रदीप तुपेरे जबाब देत असताना अनेक वेळा अडकले आणि त्याच ठिकाणी पोलिसांना संशय बाळगला आणि पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सर्व संशीयतांची वेगवेगळ्या खोलीत घेऊन विचारपूस केली असता हा सर्व बनावट असून डॉक्टर आणि राजेंद्र बहुधने यांनी भीतीपोटी सर्व प्रकरण आपल्या अंगावर घेण्याचा प्रयत्न केला होता हे समोर आले. त्यामुळे रात्री उशिरा याप्रकरणी राजेंद्र बहुधने याच्या फिर्यादी नुसार सिराज दौलत खान, मोईन खान, निसार यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular