HomeUncategorizedकर्जत शहरातील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमणे सोमवारी हटणार जिल्हाधिकाऱ्यांचे उपोषणकर्त्यांना...

कर्जत शहरातील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमणे सोमवारी हटणार जिल्हाधिकाऱ्यांचे उपोषणकर्त्यांना आश्वासन

advertisement

अहिल्यानगर दिनांक 23 मे

कर्जत येथील प्राचीन दक्षिण मुखी हनुमान मंदीर परिसरा मध्ये अतिक्रमण करून त्या ठिकाणी काही लोक मंदिराचे पावित्र्य नष्ट करत आहेत. तसेच दिवसेंदिवस हे अतिक्रमण वाढवले जात असून यामुळे मंदिर परिसरामध्ये जाण्यासाठी भावी भक्तांना मोठी कसरत करावी लागत आहे. हे अतिक्रमण तात्काळ काढावे या मागणीसाठी शशिकांत बोंगाने यांची पत्नी स्वाती बोंगाने आणि शुभम माने हे १४ मे पासून
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. तर या अतिक्रमणा विरोधात कर्जत येथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. १६ मे रोजी कर्जत बंद ठेवून कर्जतच्या ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला होता. आणि कर्जतच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
अखेर आज जिल्हाधिकारी कार्यालयात या अतिक्रमण प्रश्नाविषयी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह कर्जाचे प्रांतअधिकारी, कर्जत नगरपंचायतचे कार्यकारी अधिकारी तसेच बांधकाम विभागातील अभियंता आणि ककर्जत शहराचे पोलीस निरीक्षक यांच्यासह उपोषणकर्ते तसेच कर्जत मधील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी नागरिक यांच्यासह चर्चा करून सर्व कायदेशीर बाबी पडताळून सोमवारी अतिक्रमण काढण्याची कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणास बसलेले शशिकांत बोंगाने यांची पत्नी स्वाती बोंगाने आणि शुभम माने यांना दिल्यानंतर जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.

उपोषण सोडल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून उपोषणास बसलेले शशिकांत बोंगाणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की सोमवार पर्यंत सर्व अतिक्रमण काढण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही उपोषण सोडत आहोत

तर नगरसेवक आमदार संग्राम जगताप यांनीही या गोष्टीचा पाठपुरा सुरुवातीपासूनच सुरू ठेवला होता जिल्हाधिकाऱ्यांच्या समावेश झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून जरी लेखी आश्वासन मिळाले असले तरी जोपर्यंत अतिक्रमण निघणार नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करतच राहणार असे प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular