HomeUncategorizedअवजड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने... यादीत नाव असेल तर दंड नाही नसेल तर...

अवजड वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने… यादीत नाव असेल तर दंड नाही नसेल तर मला मोठा दंड…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 10 एप्रिल

आर टी ओ चा वसुली पॅटर्न कधी बंद होणार.कारण ओव्हरलोड वाहने राजरोसपने राज्यात फिरत आहेत त्याला आशीर्वाद हा परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांचा असल्याशिवाय हे होणार नाही.मात्र यातून मिळणारा अनधिकृत पैसा नेमका कोणकोणत्या खिशात जातो हा पण शोध घेण्याचा विषय आहे.

हा वसुलीचा प्रकार सुरू असताना एक धक्कादायक प्रकार माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी समोर आणला आहे केंद्र सरकारने २०१७ मध्ये जीएसटी कायदा लागू केला त्यानंतर देशात “वन नेशन, वन टॅक्स” लागू करण्यात आला. या निर्णयामुळे देशातील अन्य राज्यांनी ही तपासणी नाके बंद केली आहेत.मात्र महाराष्टातील नाके सुरू ठेवण्यासाठी एक रॉकेट सक्रिय झाले असून. हे रॉकेट सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही तपासणी नाके १५ एप्रिल पर्यंतच सुरू राहतील, असे सांगितले होते. त्याची अंमलबजावणी होऊ नये यासाठी मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जाते.. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने देखील सीमेवरील प्रादेशिक परिवहन विभागाची ही सहा तपासणी नाके बंद करणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही.

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे कर्की, चोरवड, नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तसेच हाडाखेड, बोरगाव आणि गवाली अशी सहा ‘आरटीओ’ ची नाके आहेत. कर्की नाका खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात येतो. ठिकाणी ओव्हरलोड या नावाखाली प्रत्येक ट्रक कडून दोन हजार रुपयाची वसुली केली जाते, असा दावा आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्वतः या नाक्यावर धाड घालून अधिकाऱ्यांना पकडून दिले होते.

अहिल्यानगर शहरातूनही अनेक ओव्हरलोड (प्रमाणापेक्षा जास्त माल वाहून नेणारे वाहने)वाहने जा ये करत आहेत मात्र या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात नाही. प्रत्येक वाहनांकडून हजार रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत दर महिन्याला वसुली केली जाते जर वाहनांचे पैसे संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत तर वाहन पकडून मेमो फाडला जातो. दर महिन्याला हजारो अवजड वाहने नगर शहरातून प्रवास करत असतात. मात्र या सर्वांकडून ठराविक रक्कम घेऊन या वाहनांना प्रवासाची मुभा दिली जाते. यासाठी अनेक एजंट कार्यरत असून. या एजंटांमार्फत दर महिन्याला यादी देऊन त्याबरोबर लक्ष्मी दर्शन ही दिले जाते या यादीमध्ये नंबर नसेल तर त्या वाहनांवर अधिकारी कारवाई करतात. या सर्व प्रकारातून दर महिन्याला लाखो रुपये अवैद्यरित्या काही अधिकाऱ्यांच्या खिशात जातात. मात्र या अवजड वाहनांमुळे अपघात आणि रस्त्यांचे मोठे नुकसान होते याकडे कोणीही पाहायला तयार नाही. त्यामुळे आता अवजड वाहनांना पकडून देण्यासाठी काही संघटना सरसावल्या असून रात्री थेट अवजड वाहने पकडूनच आरटीओ अधिकाऱ्यांना दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे सूर्य आणि जयद्रथ याप्रमाणे थेट अवजड वाहने पकडून देऊन आरटीओ अधिकाऱ्यांना त्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यास भाग पाडले जाणार आहे. यासाठी नगर शहरातील काही जागरूक नागरिक लवकरच गनिमीकाव्याने हे आंदोलन करणार आहेत.

शहरातून जाणाऱ्या खाजगी बस, स्कूल बस, शहरात सुरू असणारे विविध विकास कामे आणि त्या ठिकाणी असलेले मालवाहू वाहने, यांच्याकडून काही ठराविक रक्कम घेऊन या वाहनांना अवजड वाहतूक करण्यास मुभा दिली जाते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular