HomeUncategorizedबंडखोर शिवसेना आमदारांच्या प्रतिमेचे दहन, गद्दार आमदारांनी शिवसेना नाव काढून महाराष्ट्रात प्रवेश...

बंडखोर शिवसेना आमदारांच्या प्रतिमेचे दहन, गद्दार आमदारांनी शिवसेना नाव काढून महाराष्ट्रात प्रवेश करून दाखवावा तेव्हा समजत महाराष्ट्रातील शिवसेना आणि शिवसैनिक जिल्हाप्रमुख – प्रा. शशिकांत गाडे

advertisement

अहमदनगर दि.२९ जून

महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळामध्ये शिवसेनेमध्ये चांगले वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ अनेक शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहेत. अहमदनगर शहरातही आज अहमदनगर दक्षिण जिल्हा शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला यावेळी सर्वांनी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा सांगत मंडप बंडखोर आमदार अजूनही आपण शिवसेनेसोबत असल्याचा सांगत आहेत. त्यामुळे सध्या ते वाचत असले तरी त्यांनी फक्त शिवसेना हा पक्ष काढून महाराष्ट्रात प्रवेश करावा त्यानंतर त्यांना समजेल की महाराष्ट्रातील शिवसेना आणि शिवसेनेत काय आहे असं वक्तव्य अहमदनगर दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केल आहे.

भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या पाठीत अनेक वेळा खंजीर खूपसला मात्र त्याच भाजपबरोबर जाण्याचे भाषा बंडखोर आमदार आता करत आहेत. मात्र यामागे भाजपचा कुटील डाव असून ईडीच्या दबावाखाली हे सर्व आमदार सध्या गुहाटीला लपून बसले आहेत. अशा गद्दार आमदारांना महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही असा वक्तव्य ही शशिकांत गाडे यांनी केल आहे. मेळावा संपल्यानंतर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पळून गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या प्रतिमेचे दहन केले आणि त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular