अहमदनगर दि.८ जून
2024मध्ये पार पडणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांची भाजपने जय्यत तयारी हाती घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांनी आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा केली.
अहमदनगर शहराचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांच्यावर दक्षिण लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून तर माजी मंत्री तथा भाजपा नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कडे राहुरी अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांच्यावर नगर शहर विधानसभा प्रमुखपदी पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. “सर्व
विधानसभा प्रमुख त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर महाराष्ट्रात आणि देशात पुन्हा एकदा भाजप सरकार आणतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी व्यक्त केलाय.