अहिल्यानगर दिनांक 3 डिसेंबर
अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला
यांच्यासह राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून या पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना निवडश्रेणी (Selection Grade) मिळाली असून सध्या आहे त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. आगामी काळात त्यांची (DIG) पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने राज्याचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी हा आदेश काढला असून राज्यातील पदोन्नती मिळालेले नऊ अधिकारी पुढील प्रमाणे राकेश ओला, कृष्णकांत उपाध्याय,प्रवीण मुंढे, तेजस्वी सातपुते,एम.सी.व्ही. महेश्वर,योगेश कुमार, डी.ए. ,गेडाम,राजा. आर.,एन. टी. ठाकूर
हा शासन आदेश, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) याच्या कलम २२न मध्ये नमूद सर्वोच्च सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.