अहमदनगर दिनांक 5 ऑगस्ट
वृक्ष लागवडीचे महत्व लक्षात घेऊन ऑल इंडिया लिनेस क्लब मल्टिपल चतुर्भुजा डिस्ट्रिक्ट MH-3 गोदा तरंगच्या अध्यक्ष लतिकाताई पवार यांनी लिनेस मिटच्या कार्यक्रमात श्रावण महिन्यानिमित्त महिलांना निसर्ग पर्यावरण मंडळाचे राज्याचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांच्या हस्ते 50 बेलाच्या रोपांचे वाटप केले या वेळी राज्याच्या कार्याध्यक्ष छायाताई राजपूत ऑल इंडिया च्या मल्टिपल अध्यक्षा कुमकुम जी वर्मा( भंडारा नागपूर )पास्ट मल्टिपल अध्यक्षा डॉक्टर वर्षा झावरे पास्ट मल्टिपल अध्यक्ष अंजली कुलकर्णी समता इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका सौ सुवासिनी कोयते उपस्थित होत्या.
श्रावण महिना आणि बेलाचे फार महत्वाचे नाते आहे श्रावण महिन्यात श्री शंकराला पिंडीवर वाहण्यासाठी बेलाचे पाने तोडली जातात मात्र जर भविष्यात झाडच उरले नाहीत तर श्रावण महिन्यात शंकर मंदिरात जाऊन काय वाहनार त्यामुळे वृक्ष लागवडीचे महत्त्व लक्षात घेऊन बेलाचे रोपांची वाटप यावेळी करण्यात आले.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड अत्यंत गरजेची आहे निसर्गाचे वेगवेगळी रुपये आपण सध्या पाहतच आहोत मात्र वृक्ष लागवडीमुळे निश्चितच आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड हे महत्त्वाचं काम प्रत्येकाने करणे गरजेचे आहे त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून लतिकाताई पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन ठिकठिकाणी वृक्षारोपण केले आहे.