अहमदनगर दि .१५ फेब्रुवारी
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी अशोक कटारिया,अनिल कोठारी,राजेंद्र लुणिया ,प्रदिप पाटील
सी ए शंकर अंदानी यांचा जेलमधून मुक्काम वाढला असून आज नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी सुनावणी होती आज कोणाच्या जामिनावर कोणताच निर्णय झाला नाही त्यामुळे आरोपींचा जेल मधील काही दिवस मुक्काम वाढला आहे. तर नवी दिल्ली केन्द्रीय अर्थ सचिवांसमोर नगर अर्बन बँक लायसेंस रद्द विरूद्ध अपील सुनावणी होणार आहे. आज अहमदनगर येथील न्यायालयाने पुढील सुनावणी 29 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
तर अर्बन बँकेच्या 291 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत बँकेतील अधिकारी आणि संचालक अटक झाले होते मात्र प्रथमच या घोटाळ्यात एका कर्जदराला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे आता ज्या कर्जदारांनी खोटे कागदपत्र देऊन कर्ज घेतले आहेत अशा कर्जदारांवर आर्थिक गुन्हे शाखेची नजर असणार आहे. तर आज प्रथमच नगर अर्बन बँकेकडून ठेवीदारांच्या हिताची भूमिका घेतली गेली असून बँकेकडून हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात एकूण १०५ आरोपी असून, यापैकी माजी तज्ज्ञ संचालक शंकर अंदानी यास अटक
करण्यात आली आहे. नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी अध्यक्षांसह दोन संचालकांना अटक
करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आज न्यायालयात सुनावणी वेळी ठेवीदारांची मोठी गर्दी होती.