अहमदनगर दिनांक 10 जुलै
अहमदनगर शहरातील माळीवाडा भागातून मार्केट यार्ड कडे जाणाऱ्या रोडवर सायंकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या सुमारास एका दुकानदारावर गोळीबार करण्याची घटना घडली मात्र त्या ठिकाणी असलेल्या मूळव्याध तज्ञ डॉक्टर मुळे दुकानदाराचे प्राण वाचले. डॉक्टरच्या एका जुन्या दवाखान्यातील सहायकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मात्र ही गोळी बंदुकीतच अडकल्यामुळे पुढील अनर्थ टाळला.
गेल्या अनेक दिवसांपासून डॉक्टर आणि त्यांच्या सहायकांमध्ये काही विषयांवरून वाद सुरू होते याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्येही त्या डॉक्टरने सहाय्यकविरुद्ध तक्रार केली होती. मात्र आता सर्व विसरून चर्चेसाठी या अशी बतावणी करत एका दुकानात डॉक्टरला बोलवून चर्चा करत असताना मध्यस्थी करणाऱ्या दुकानदारावरच बंदूक रोखून फायर करण्याचा प्रयत्न झाला मात्र सुदैवाने शेजारी असल्यावर डॉक्टरने बंदूकधारी माणसाला ढकलून दिल्याने गोळी बंदुकीचा अडकल्याने पुढील अनर्थ टाळला.