अहिल्यानगर दिनांक 22 मे
अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बदली बृहन्मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून झाली असून त्यांच्या जागी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
सोमनाथ घार्गे यांनी सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस उपाधीक्षक म्हणून काम पाहिले असून श्रीरामपूर पोलीस उपाधीक्षक म्हणून ते नियुक्ती होते त्यामुळे त्यांना जिल्ह्याची बऱ्यापैकी माहिती असणार आहे त्यांच्यासमोर आगामी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत निवडणुकी शांततेत पार पाडण्याची जबाबदारी असेल.