अहिल्यानगर २३ मे
प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम न करता फक्त मध्यस्थी करून लाखो करोडोंची संपत्ती पाहून नक्कीच सर्वसामान्यांचे डोळे फिरणार एवढी संपत्ती खाजगी एजंट कमवतात तर अधिकारी किती कमवत असतील हे सांगायला नको.
खाजगी ट्रान्सपोर्ट, बाहेरील प्रांतातील वाहनांची एंट्री फी, सिमा नाक्यावर वसुली आणि RTO कार्यालयात सर्वच कामाचे कमिशन मिळून लाखो रुपयांची वरची माया गोळा करण्याचे काम ज्या खाजगी एजंट कडे आहे, ते एजंट सुद्धा आता कोट्याधीश झाले असून त्यांच्या प्रॉपर्ट्या बघितल्या तर सर्वसामान्य माणूस चक्रावून जाईल एवढी भयंकर स्थिती सध्या दिसत आहे. दरम्यान याबाबत एसीबीच्या महासंचालकांकडे काही सामाजिक संघटना तक्रार करणार असल्याने खाजगी एजंटचा बाजार लवकरच उठणार असल्याचे बोलले जात आहे.
अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट करून लक्ष्मी दर्शन करून देण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या खाजगी एजंटच्या भ्रष्टाचाराच्या चूरस कथा सध्या रडारवर असून दररोज एक एक खुलासे होतं आहे,
या भ्रष्टाचारात सर्वच अधिकारी सामील नसतात मात्र ठराविक अधिकारी यांच्या तोंडाला पैशाचे रक्त लागले आहे ते अधिकारी भ्रष्टाचार करून इतर चांगल्या अधिकाऱ्यांचे नाव आणि आपल्या विभागाचे नाव बदनाम करतात.
कोण आहेत हा कोट्याधीश एजंट उबेद ? आणि इतर एजंट?
RTO कार्यालयात खाजगी काम करणाऱ्या एजंट ची संख्या 50 च्या घरात असून काही दिवसापूर्वी उबेद नामक एजंट हा सध्या सर्व इतर एजंटचा कारभार पाहत आहे. आरटीओ कार्यालयात इनामी ईदबारी काम करणारी एजंट आहेत मात्र उबेद सारखे एजंट इतर कमाईतून अधिकाऱ्यांना लाखो करोड रुपये देत असल्याचा चुरस कथा सध्या ऐकायला मिळत आहेत
या उबेद संपत्ती कोट्यावधींच्या प्रमाणात असून दरम्यान जो व्यक्ती आरटीओ कार्यालयाच्या परिसरात मागील 25 वर्षापासून लर्निंग, परमनंट, साधे फार्म भरण्याचे काम करणारे ते बिचारे एजंट अजूनही जुन्या दुचाकी वर फिरतात. मात्र उबेद सारखे काही बोटावर मोजणारे एजंट कोट्यावधींची माया जमा करून बसले आहेत. तो जर कोट्याधीश असेल तर मग त्यांच्या वसुलीतून येणाऱ्या पैशाचा वाटा ज्या अधिकाऱ्यांना मिळतो तो अधिकारी किती कमावत असेल हे यावरून दिसत आहे, दरम्यान यापुढे ओव्हरलोड वाहतूक कार्ड चालवणाऱ्या त्या RTO एजंट सह भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या अधिकारी यांची पोलमखोल होतच राहणार…